सरपंचा सुनिता मेश्राम व्दारे पत्रकार दिनी पत्रकारांचा सत्कार
कन्हान : – दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती पत्रकार दिनाचे औचित्य साधुन टेकाडी ग्रा प सरपंचा सुनिताताई मेश्राम व मित्र परिवार व्दारे कन्हान च्या पत्रकारांचा सत्कार करून पत्रकार दिन साजरा करण्यात आला.
दि.६ जानेवारी २०२१ ला पत्रकार दिन, मराठी वृत्तपत्राचे दर्पणकार व पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीचे औचित्य साधुन ग्राम पंचायत टेकाडीच्या सरपंचा सुनिताताई मेश्राम व मित्र परिवार व्दारे वेकोलि नविन वसाहत टेकाडी येथे सरपंचा सुनिताताई मेश्राम व पुथ्वीराज मेश्राम यांच्या हस्ते ग्रामिण पत्रकार संघ जिल्हा उपाध्यक्ष मोतीराम रहाटे, कन्हान अध्यक्ष रमेश गोळघाटे, कार्याध्यक्ष अजय त्रिवेदी, मार्गदर्शक एन एस मालविये सर, उपाध्यक्ष कमलसिंह यादव, सचिव सुनिल सरोदे, कोषाध्यक्ष रविंद्र दुपारे, सदस्य शांताराम जळते, गणेश खोब्रागडे, रोहीत मानवटकर, ऋृषभ बावनकर, मराठी पत्रकार संघ कन्हान अध्यक्ष सुर्यभान फरकाडे, सतिश घारड , चंद्रकुमार चौकसे, धनंजय कापसीकर, किशोर वासाडे , अनिल जाधव, जयंत कुंभलकर, प्रकाश तिवारी आदी पत्रकारांचा पुष्प गुच्छ, भेट म्हणुन कव्हर फॉईल देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता ग्रा प सदस्या सिधुं सातपैसे, सुरेखा काबंळे, विनोद गडपायले, प्रतिक, स्वाती, अंकुश मेश्राम आदी ने सहकार्य केले. स्नेह भोजनाने कार्यक्रमाची सांगता करून पत्रकार दिनी पत्रकारांचा सत्कार करून पत्रकार दिन थाटात साजरा करण्यात आला.