विधानसभा अध्यक्षपदी तिबोले यांची निवड
सावनेर. समाजसेवक सुधाकर तिबोले यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या सावनेर- कळमेश्वर विधानसभा क्षेत्राच्या अध्यक्षपदी निवड झाली. ही निवड राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार प्रफुल्ल पटेल, माजी मंत्री सुनील तटकरे, जिल्हाध्यक्ष शिवराज बाबा गुजर, शहराध्यक्ष प्रशांत पवार यांनी केली. नागपूर येथील देशपांडे सभागृहात आयोजीत कार्यक्रमात
तिबोले यांना नियुक्तपत्र देण्यात आले. या नियुक्तीचे प्रा. विठ्ठल कोल्हे, विजय रडके, सुभाष शेंबेकर, शेखर बनाईत, राजू पाल, निळकंठ ढवंगाळे, भुजंग मोजनकर, महिंद्रा सातपुते, संजय तुमाने, विनोद नष्कल, नंदु भोयर, दिनेश इंगोले, मयूर जोशी, दादू महाजन, युवराज अंबरते, वसंता भागवत, संदीप भक्ते, योगेश वाडबुधे, निलेश परमोडे, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय मराठा महासंघ पदाधिकारी व जीटीएन इंडस्ट्रीज कामगारांनी त्यांचे कौतुक केले.