प्राथमिक आरोग्य केंद्रात रक्तदान आणि आरोग्य शिबीर नागरिकांनी शिबीराचा लाभ घ्यावा – डॉ.शशांक राठोड
कन्हान,ता.८फेबुवारी
सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग महाराष्ट्र शासन यांचा आदेशानुसार ९ फेब्रुवारी ला राज्यभरात सर्व प्राथमिक आरोग्य केंन्द्र, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय या ठिकाणी महारक्तदान शिबीर आणि आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
या अनुषंगाने प्राथमिक आरोग्य केंन्द्र कन्हान येथे आज गुरुवार (दि.९) फेब्रुवारी ला सकाळी साळे नऊ वाजता ते सायंकाळी साडे चार वाजता पर्यंत भव्य महारक्तदान शिबीर आणि आरोग्य शिबीर घेण्यात येईल. आरोग्य शिबीरात प्राथमिक आरोग्य केंन्द्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ.शशांक राठोड, डॉ.तेजस्वीनी गोतमारे, डॉ.नाझरा मॅडम सह आदि आरोग्य कर्मचारीच्या मदतीने नागरिकांच्या दमा, अस्थमा, रक्त तपासणी, बीपी, शुगर तापासणी सह विविध प्रकारच्या बीमारी ची तपासणी करण्यात येईल.
तसेच नागरीकांना आरोग्य सुविधा निशुल्क मिळण्याकरिता, गरजुंना रक्ताची मदत करण्याकरिता तसेच कुणाचे जीव वाचविण्याकरिता महारक्तदान शिबीराचा आणि आरोग्य शिबीराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा. असे आव्हान कन्हान प्राथमिक आरोग्य केंन्द्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ शशांक राठोड यांनी केले आहेत.
Post Views: 159
Wed Feb 8 , 2023
*घाटंजी येथे सेवाध्वज स्थापना व पुतळा अनावरण पूर्व तयारी सभा संपन्न. ————————————— *सेवादास महाराज विज्ञान योगी पुरुष -ना.संजय राठोड *समन्वय समिति व राष्ट्रीय बंजारा टायगर्स यांचे नियोजन घाटंजी – संपूर्ण देशातील बंजारा समाजाची काशी म्हणून ओळख असलेल्या पोहरादेवी व उमरी गड येथे येत्या १२ फेब्रुवारीला सेवाध्वज स्थापना व सेवादास महाराज […]