*कन्हान च्या अनिकेत लखन पुरवले यांनी दुबई येथे भारताला मिळवुन दिला अंजिक्यपद*
*अनिकेत लखन पुरवले याने उत्कृष्ट कामगिरी करुन कन्हान शहराचे नाव रोशन केल्याबद्दल कन्हान शहर विकास मंच च्या पदाधिकार्यांनी केले स्वागत*
कन्हान – दुबई येथे झालेल्या चार देशांच्या अंडर – २३ क्रिकेट टूर्नामेंट मध्ये भारताच्या कॅप स्टार अकादमीने उपविजेते पद पटकाविले असुन या स्पर्धेत कन्हान च्या अनिकेत लखन पुरवले याने दुबई येथे भारताला अंजिक्यपद मिळुन दिल्याबद्दल तसेच कन्हान शहराचे नाव रोशन केल्याबद्दल कन्हान शहर विकास मंच च्या पदाधिकार्यांनी मंच उपाध्यक्ष रुषभ बावनकर यांचा उपस्थिती मध्ये अनिकेत लखन पुरवले याला पुष्प गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले .
दुबई झालेल्या अंडर २३ क्रिकेट टूर्नामेंट मध्ये भारत , पाकिस्तान , श्रीलंका व बांग्लादेश येथील संघ सहभागी झाले असुन शारजा खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात बांग्लादेशच्या संघाने कॅपस्टाॅर भारताला सुपर ओव्हर मध्ये पराभुत करुन विजेतेपद पटकाविले असुन या अंतिम सामन्यात कन्हान च्या अनिकेत लखन पुरवले याने २२ चेंडुत ४८ धावांची खेळी करुन सामनावीर पुरस्कार जिंकला व त्याला प्रमुख अतिथींच्या हस्ते ट्राॅफी तसेच सुवर्ण पदक देण्यात आले . कन्हान येथील स्वामी विवेकानंद नगर येथे राहणारा २१ वर्षीय अनिकेत लखन पुरवले लुधियाना येथील युसुफ पठान च्या क्रिकेट कॅम्पं अकादमीत सराव केल्याने अनिकेत लखन पुरवले हा अंतराष्ट्रीय क्रिकेट टूर्नामेंट मध्ये खेळणारा मांग गारोडी समाजातील पहिला क्रिकेटपटु ठरला आहे . अनिकेत लखन पुरवले याने उत्कृष्ट कामगिरी करुन कन्हान शहराचे नाव रोशन केल्याबद्दल कन्हान शहर विकास मंच च्या पदाधिकार्यांनी मंच उपाध्यक्ष रुषभ बावनकर यांचा उपस्थिती मध्ये अनिकेत लखन पुरवले याला पुष्प गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले . या प्रसंगी कन्हान शहर विकास मंच अध्यक्ष प्रवीण गोडे , उपाध्यक्ष रुषभ बावनकर , सचिव प्रदीप बावने , महासचिव संजय रंगारी , हरीओम प्रकाश नारायण , रविन्द्रंर सांकला , नितिन मेश्राम , प्रशांत मसार , आदि मंच पदाधिकारी उपस्थित होते .