दोन दुचाकी च्या अपघातात एकाचा मुत्यु तर दुसरा गंभीर जख्मी
कन्हान : – शहरातील नागपुर जबलपुर चारपदरी महामार्गाच्या दोन्ही बाजुला वसलेले असुन महामार्गा वर व लगत फुटपाथावर दिवसेदिवस अतिक्रमण वाढ ल्याने महामार्गावरील स्टेट बॅक व खंडेलवाल लॉज समोर दोन दुचाकीचा अपघातात एका इसमाचा मुत्यु झाला तर दुस-या दुचाकी चालक गंभीर जख्मी झाल्या ने नागपुर येथे उपचार सुरू असुन १२ तासा नंतरही कन्हान पोलीस स्टेशन ला बातमी लिहेपर्यंत घटनेची नोंद झाली नव्हती.
शहर हे नागपुर जबलपुर चारपदरी महामार्गा च्या दोन्ही बाजुला वसलेले असुन महामार्गावर व लगत फुटपाथावर दिवसेदिवस अतिक्रमण वाढुन भाजीपाला व इतर दुकाने, हाथठेले आणि वाहने महा मार्गावरच लागतात तसेच महामार्ग लगत मोठी दुकाने , बॅक, कार्यालय असुन पार्कींग ची जागा नसल्याने येथे येणा-याना महामार्गावरच वाहने उभी करावी लागत असल्याने चारपदरी महामार्ग ऐकेरी होत वाहन चालकांना शहरातुन वाहन चालविताना चांगलीच तारे वरची कसरत करावी लागत असुन दररोज अपघात होऊन निर्दोष नागरिकांना भयंकर त्रास सहन करून अपघात होऊन वेळे प्रसंगी अपंगत्व किंवा मुत्युस बळी पडावे लागत आहे. यांची प्रचिती मंगळवार (दि. ५) एप्रिल ला सकाळी ८.४५ वाजता नागपुर जबलपुर महामार्गावरील स्टेट बॅक व खंडेलवाल लॉज समोर दोन दुचाकी अपघात होऊन एकाचा उपचारार्थ नेताना रस्त्यात मुत्यु झाला तर दुसरा वाहन चालक गंभीर जख्मी असल्याने नागपुर येथे उपचार सुरू आहे.
हनुमान नगर कन्हान येथील मृतक अशोक खंडेलवाल हे मोपेड दुचाकी क्र एम एच ४० यु ९८३३ ने घरून भाजीपाला घेण्यास आले असता मनसर कडुन नागपुर कडे जात असताना कन्हान शहरातील चारपदरी महामार्गा वरील स्टेट बॅक व पलीकडील खंडेलवाल लॉज च्या समोर अपाची दुचाकी वाहनाची धडकेने झालेल्या अपघातात दोन्ही वाहन चालक गंभीर जख्मी झाल्याने एका ऑटोने प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान ला नेले. दुखापत गंभीर असल्याने मोपेड दुचाकी चालक अशोक खंडेलवाल वय ६३ वर्ष यांना कामठी खाजगी दवाखान्यात नेताना रस्त्यात मुत्यु झाला. तर अपाची दुचाकी चालक रविंद्र महुलाल मडावी वय २७ वर्ष राह. कांचनी जि. शिवनी यास शासकीय रूग्णालय नागपुर येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती गंभीर असल्याचे बोलल्या जात आहे. अपघात होऊन १२ तास होऊन सुध्दा कन्हान पोलीस स्टेशन ला बातमी लिहे पर्यंत घटनेची नोंद झाली नव्हती.
j
मृतक – अशोक खंडेलवाल