आधार कार्ड नुसार स्थानिक लोकांना द्यावी प्राथमिकता : माजी जि. प. उपाध्यक्ष मनोहर कुंभारे
सावनेर : १८ ते ४५ वयोगटातील लसिकरणासाठी ऑनलाईन नोंदणी करण्यात आलेल्या सर्व नागपूरच्या नागरीकांचे सावनेरमध्ये लसिकरण करण्यात येत असल्याने नागपूर जि.प. उपाध्यक्ष मनोहर कुंभारे यांच्या नेतृत्वात सावनेर च्या लसिकरण केंद्रावर स्थानीकांचेच लसिकरण करण्यावर जोर देत गोंधळ घालण्यात आला . यामुळे सावनेरच्या भालेराव हायस्कुल येथे लसिकरणासाठी निर्माण झालेल्या गोंधळात राजकिय कार्यकर्त्यांनी गोंधळ घातल्याने काही तास लसीकरण थांबवावे लागले . राज्य सरकार द्वारे कोविड शिल्ड व कोवॅक्सीन अश्या दोन प्रकारच्या लसी कोरोनापासून बचावा करीता नागरीकांना लावण्यात येत आहे . कोविशिल्ड ही वॅक्सीन ( लस ) अमेरीकेच्या ऑक्सफोर्ड अॅक्राझेनका व भारताच्या सिरम इंस्टीटयुट ने मिळून भारतात बनविलेली आहे . तर को – वॅक्सीन ही भारतातील निर्मीती आहे . त्यामुळे को – वॅक्सीन ही आधी आली व कोविशिल्ड ही नंतर , दोन्ही कंपन्या दोन्ही वॅक्सीन चांगल्या असल्याचा दावा करीत आहे . परंतू भारतातील कोवॅक्सीन ही म्युटेंड वायरसलाही डिटेंड ( शोधत ) करीत असल्याचे तज्ञांचे मत आहे .
सावनेर शहरातील विविध केंद्रात कोविशिल्ड ही लस लावण्यात येत असून शासनाने १८ वर्षा वरिल तरूणांना कोवॅक्सीन लसिकरणासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचा मार्ग काढला आहे . परंतू या ऑनलाईन नोंदणी मध्ये नागपूर जिल्हयात ४ केंद्र ठरविले असून यात सावनेर , काटोल , कन्हान , कामठी , अशी शहरे आहेत . त्यामुळे ज्यांना जे ठिकाण सोईचे आहे ते त्या ठिकाणाला पसंती दाखवून वॅक्सीनच्या पसंतीनुसार नोंदणी करीत आहे . यात सावनेरच्या युवकांची ऑनलाईन नोंदणी न झाल्याने व नागपूरच्या युवकांना ३०० ते ३०० लसीचे रजिस्ट्रेशन सावनेर केंद्र मिळाल्याने येथील नागरीकांनी लसिकरणासाठी कुठे जावे ? असा प्रश्न उपस्तिथ करीत नागपूर जि.प. चे उपाध्यक्ष मनोहर कुंभारे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह सावनेर येथील भालेराव हायस्कुल च्या लसिकरण केंद्रावर गोंधळ घालीत सुरू असलेले लसिकरण थांबविण्यात आले . यावेळी सावनेरचे उपविभागिय अधिकारी अतुल मेहेत्रे यांनी केंद्रावर धाव घेवून यासंमधी जिल्हाधिकाऱ्यांस माहिती देत अधिक वॅक्सीनचे केंद्र उभारण्याचे आश्वासन दिले . यामुळे थांबलेले लसिकरण पुन्हा पुर्ववत सुरू करण्यात आले .