धर्मराज कनिष्ठ महाविद्यालयाचा १०० % निकाल
#) कन्हान शहरातुन बारावी परिक्षेत मुलीने बाजी मारली.
कन्हान : – राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागाद्वारे बुधवारी जाहीर करण्यात आलेल्या १२ वी च्या मार्च २०२२ च्या निकालात धर्मराज कनिष्ठ महा विद्यालयाचा १०० %, नारायण विद्यालय १०० %, निकाल लागला असुन याहीवर्षी कन्हान शहरातुन मुलीनी मुलाच्या तुलनेत निकालात बाजी मारली आहे .
बारावी परीक्षा ४ मार्च ते ३१ मार्च दरम्यान होम सेंटरवर घेण्यात आली होती. मार्च २०२२ च्या घोषित निकालात धर्मराज कनिष्ठ महाविद्यालय कांद्री-कन्हान चे विज्ञान शाखेत ८३ विद्यार्थी परिक्षेत बसले असुन ८३ विद्यार्थी पास होऊन विद्यालयाचा १०० % निकाल लागला. यात कु जानवी सेवकराम भोंडे ९०.३३ % गुण प्राप्त करून विद्यालयातुन प्रथम तर कु सानिका अनिल मंगर हीने ८८ % गुण प्राप्त करून दुस-या क्रमाक पटकाविला आहे. नारायण विद्यालय कन्हान येथील विज्ञान व वाणिज्य शाखेचा १०० % निकाल. यात विज्ञान शाखेत कु खु़शी सुनिल मेश्राम ८४.८३ % आणि वाणिज्य शाखेत देवांश महेश दिक्षीत ८३.०० % गुण प्राप्त करून विद्यालयातुन प्रथम आले आहे.
भारतरत्न इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालय कन्हान येथील कला शाखेत बसलेलं १४४ पैकी १२७ विद्यार्थी उतिर्ण विद्यालयाचा निकाल ९०.०७ % तर वाणिज्य शाखेतुन ७१ पैकी ७१ उत्तीर्ण होऊन १००% निकाल लागला आहे. कला शाखेतुन कु.पलक सोमनाथ मरस्कोल्हे हिने ६०० पैकी ४६१ गुण मिळवुन ७६.८८ % ने उत्तिर्ण होऊन प्रथम, कृ नेहा ज्ञानेश्वर पटले हिने ६०० पैकी ४२३ गुण मिळवुन ७०.०५ % मिळवुन व्दितीय तर कु अंकली रविराम कुळसते हिने ६०० पैकी ४०६ गुण ६७.६६ % मिळवुन तृतिय क्रमाक पटकविला आहे. आणि वाणिज्य शाखेत प्रथम कु आकांशा हरिचंद्र चकोले ने ६०० पैकी ४७० म्हणजे ७८.३३ %,व्दितीय, कु धनेश्वनी विजाऊ बघेल ६०० पैकी ४५४ गुण प्राप्त करून ७६.१६ % तर तृतीय अनिकेत सुर्यभान येळणे याने ६०० पैकी ४५१ गुण प्राप्त करित ७५.१६ % मिळुन उत्तीर्ण झाला आहे. यामुळे याही वर्षी मुलीने बाजी मारली आहे.
फोटो –
१) कु जानवी सेवकराम भोंडे
२) कु सानिका अनिल मंगर
३) कु नेहा ज्ञानेश्वर पटले
४) कु धनेश्वनी विजाऊ बघेल
५) अनिकेत सुर्यभान येळणे