कन्हान ला नवरात्र महोत्सव उत्साहात शुभारंभ
#) कावड यात्रा, विविध मातेच्या मंदिरात घट स्थापना, पुजा अर्चनेने नवरात्र महोत्सव सुरू.
#) शासनाच्या नियमाचे काटेकोर पणे पालन करून नवरात्र महोत्सव साजरा करा – नप प्रशासन
कन्हान : – कन्हान शहरात व परिसरात नवरात्र महो त्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. परंतु गेल्या दोन वर्षा पासुन देशात, राज्यात, जिल्ह्यात, शहरात व परिसरात कोरोना महामारीमुळे या उत्साहा वर ब्रेक लागला होता. परंतु या वर्षी शहरात व परिस रात कोरोनाचा प्रार्दुभाव नसल्यामुळे शहरात कावड यात्रा काढुन तसेच विविध मातेच्या मंदिरात घट स्था पना, पुजा अर्चना, आरती आणि विविध धार्मिक कार्यक्रमाने नवरात्र महोत्सवाचा उत्साहात शुभारंभ करण्यात आला.
कन्हान शहरात नवरात्र महोत्सवाचा शुभारंभ दरवर्षी मोठी कावड यात्रा काढुन होतो. परंतु गेल्या दोन वर्षापासुन कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे काव ड यात्रा काढण्यात आलेली नाही. परंतु हया वर्षी शह रात कोरोनाचा प्रादुर्भाव नसल्यामुळे सार्वजनिक नव दुर्गा उत्सव मंडळ पिपरी-कन्हान द्वारे कन्हान नदीचे पावन जल कलशा मध्ये भरून कावड यात्रा बीकेसीपी शाळे जवळुन ढोल ताशा, डिजे वाजवुन नाचत गाचत काढण्यात आली असता गांधी चौक कन्हान येथे कन्हान शहर विकास मंच पदाधिका-यांनी संस्थापक अध्यक्ष ऋृषभ बावनकर यांच्या प्रमुख उपस्थितीत फुलाच्या वर्षाव व फळ वितरण करून कावड यात्रेचे जोरदार स्वागत करण्यात आले. पुढे ही यात्रा राष्ट्रीय महामार्गाने आंबेडकर चौक येथे आली असता नागरि कांनी जागोजागी फुलांचा वर्षाव व गुलाल उडवुन जोरदार स्वागत करण्यात आले. पिपरी रोडने ही यात्रा पिपरी येथील दुर्गा मंदिरात पोहचली असता नागरिकां न द्वारे कन्हान नदीच्या पवित्र जलाने दुर्गा मातेचे स्नान , अभिषेक, घटाची स्थापना करून विविध पुजाअर्चना आरती करून उपस्थित भाविक मंडळीना वृक्ष व फळ वाटप करून नवरात्र महोत्सवाचा शुभारंभ मोठ्या उत्साहात करण्यात आला. नऊ दिवस सकाळी, सायं काळी आरती, विविध धार्मिक कार्यक्रम शासनाच्या नियमाचे पालन करून करण्यात येणार आहे.याप्रसंगी कन्हान-पिपरी नगरपरिषद चे नगरसेवक राजेंद्र शेंदरे, अजय लोंढे, मनोज कुरडकर, महेंद्र साबरे, दिपक तिवाडे, ऋृषभ बावनकर, हरीओम प्रकाश नारायण, महादेव लिल्हारे, प्रकाश कुर्वे, हर्ष पाटील, सुरज वरख डे सह मोठ्या संख्येत नागरिक उपस्थित होते. कार्यक्र माच्या यशस्वितेकरिता सार्वजनिक नवदुर्गा उत्सव मंडळ पिपरी-कन्हानचे केशरीचंद खंगारे, प्रशांत मसार , राधेश्याम भोयर, पवन भोयर, खुशाल येलमुले, आकाश भगत, अभिषेक ताजणे, विक्रम तिवाडे, विशाल थुटे, अशफाक शेख, राहुल खडसे, कृणाल तिवाडे, रोशन चवरे, भोला भोयर, रोशन खंगारे, गजा नन कडनायके, अभिषेक भोले सह भाविक नागरिक सहकार्य करित आहे.
राजराजेश्वरी दुर्गा माता मंदीर धरम नगर कन्हान
नवयुवक दुर्गा उत्सव मंडळ धरम नगर कन्हान व्दारे राजराजेश्वरी दुर्गा माता मंदीरात मातेच्या मुर्तीचे कन्हान नदीच्या पवित्र जलाने स्नान, अभिषेक, घटाची स्थापना, विधीवंत पुजा, अर्चना व आरती करून विवि ध धार्मिक कार्यक्रमाने नवरात्र महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला .
शितला माता मंदीर कांद्री-कन्हान
राष्ट्रीय महामार्गावरील कांद्री-कन्हान येथील शितला मातेच्या मंदिरात घटाची स्थापना किशोर बावने व गणेश शर्मा या परिवारांच्या हस्ते करण्यात आली असुन विधीवत पुजा, अर्चना व आरती करून प्रसाद वितरण करून नवरात्र महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला. नऊ दिवस विविध धार्मिक कार्यक्रम कपण्यात येणार असुन (दि.१३) ऑक्टोंबर ला हवन, पुजा पाठ, आरती व प्रसाद वितरण करण्यात येईल. (दि.१४) ऑक्टोंबर ला दुपारी १२:३० वाजता मंदिरात घट विर्सजन करणार असुन सायंकाळी ६:३० वाजता कन्या भोजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नऊ दिवस सकाळी ७ व सायंकाळी ७:३० वाज ता आरती होणार आहे. या सर्व कार्यक्रमात भाविक नागरिकांनी उपस्थित राहुन लाभ घ्यावा असे आवाहन शितला माता मंदिर कमेटी द्वारे करण्यात आले आहे.
शारदीय नवरात्र महोत्सव कार्यक्रमाच्या यशस्विते करिता संजय चौकसे, दिलीप मरघडे, अशोक खैरकर, चंन्द्रशेखर बावनकुळे, वामन देशमुख, महेश मंगतानी, प्रकाश ढोके, वसंता राऊत, प्रितेश मेश्राम, पारस मरघडे, प्रकाश हटवार, ओमदास लांढे, नरेश रक्षक, प्रदीप सिल्लेवार सह आदि भाविक नागरिक सहकार्य करित आहे.
मॉ जगदंम्बा मंदीर रामनगर गुरफुडे ले-आऊट कन्हान
रामनगर गुरफुडे ले-आऊट कन्हान येथील माॅ जगदंम्बा मातेच्या मंदिरात पुजा, अर्चनासह घट स्थापना करण्यात आली असुन आरती व विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करून नवरात्र महोत्सव चा शुभारंभ करण्यात आला. महोत्सवाच्या यशस्विते करिता माँ जगदंबा सेवा समिती राम नगर, गुरफडे ले-आऊट कन्हानचे अध्यक्ष गजानन राठी, सचिव सुनिल लाडेकर, मुरलीधर नानोटे, चंपालाल छलीया, पुंडलिक कौनडलकर, राजेश माहुरकर, सुभाष रोकडे, लक्ष्मी लाडेकर, अर्चना नांनोटे, रेखा ढगट, दिनकर मस्के, शेषराव बावने, लता नानोटे, वैशाली भांदकर, आशा छलीया, ज्योती राठी, कमल भांदकर, लता वंजारी, रंजना माहुरकर, महादेव भगत आदी सह भाविक मंडळी सहकार्य करित आहे.
शासनाच्या नियमाचे काटेकोरपणे पालन करूनच नवरात्र महोत्सव साजरा करा – नप प्रशासन
महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अजुनही आटोक्यात न आल्याने राज्य शासनाच्या कोरोना विष यक मार्गदर्शक सुचनांचे पालन करूनच नवरात्र महो त्सव साजरा करा. तसेच कोरोना विषयक सुचनांने पालन न केल्यास योग्य कार्यवाही करण्यात येईल असे कडकडीचे आवाहन कन्हान-पिपरी नगरपरिषद प्रशासन द्वारे करण्यात आले आहे.