दोन दिवस देवी मुर्ती व घट च्या विर्सजनाने नवरात्र महोत्सवाची सांगता
कन्हान,ता.08 ऑक्टोबर
शहरात आणी परिसरातील तीस गावात देवी मातेच्या मंदिरात व सार्वजनिक उत्सव मंडळाने कलश, कावड यात्रा, विधिवत पुजा अर्चना करून घट स्थापना व देवी मुर्तीची स्थापना करून नवरात्र महोत्सवाची थाटात सुरूवात करण्यात आली. मंदिरात व सार्वजनिक मंडळाने विविध भजन कीर्तन, सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल करून कन्हान नदी पात्रात दोन दिवस घट विर्सजन आणि देवी मुर्तीच्या विर्सजनाने नवरात्र महोत्सवाची सांगता करण्यात आली.
शहरात आणि परिसरात नवरात्र महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. परंतु मागील दोन वर्ष संपुर्ण देशात कोरोनाचे थैमान पसल्याने शासनाने सण उत्सवावर बंदी घातल्याने नागरिकांनी सण,उत्सव आपल्या घरोघरी परिवारातील सदस्या सोबत साजरे केले. सध्या च्या परिस्थितीत कोरोना चा प्रादुर्भाव नियंत्रणात असल्याने व शासनाने निर्बंध हटविल्याने सण उत्सव मोठ्या उत्साहात साजरे होत आहे. सोमवार (दि.२६) सप्टेंबर ला कन्हान शहरात भव्य कलश, कावड यात्रा काढुन आणि ग्रामिण भागातील देवी मातेच्या मंदिरात व सार्वजनिक उत्सव मंडळाने विधिवत पूजा अर्चना करून घट स्थापना व देवी मुर्तीची स्थापना करून नवरात्र महोत्सवाची थाटात सुरूवात करण्यात आली होती. नव दिवस दररोज सकाळ, सायंकाळ आरती, दुपारी भजन कीर्तन, रात्री जस गायन, जागरण, सांस्कृतिक कार्यक्रम, गरबा सह अनेक विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजनाने नऊदिवस धार्मिक वातावरण निर्माण झाले होते. नवमी च्या दिवशी महाप्रसादाचा भाविक भक्त मंडळीने लाभ घेतला. बुधवार (दि.५) व गुरुवार (दि.६) ऑक्टोंबर या दोन दिवस कन्हान नदी महाकाली मंदीर घाटाच्या नदी पात्रात घट विर्सजन आणि देवी मुर्तीच्या विर्सजन करून नवरात्र महोत्सवाची थाटात सांगता करण्यात आली.
Post Views: 756
Sun Oct 9 , 2022
दुचाकी वाहना सह चाळीस हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त कन्हान,ता.08 ऑक्टोबर पोलीस स्टेशन अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामिणचे पथक पेट्रोलिंग करीत असतांना गुप्त बातमीदारा कडुन खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोलीसांनी लुटमार व चोरीचे दोन आरोपी पकडुन त्यांच्या जवळुन एक मोबाइल व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी वाहना सह एकुण चाळीस […]