महामानवाला अनेक संघटनांनी सावनेर येथे पुष्पहार अर्पण करुन मानवंदना
सावनेर : महापरिनिर्वाण दिनानिमित्त बसस्थानकातील डॉ आंबेडकर यांच्या पुतळ्यास शहरातील सामाजिक आणि विविध राजकीय संघटनांनी पुष्पहार अर्पण केले. सरकारच्या सूचनेनुसार कोरोना विषाणूच्या नियमांचे पालन करून नियमांचे पालन करून स्वागत करण्यात आले. बुद्धांची पूजा केली गेली. शिवसेनेचे माजी तालुकाध्यक्ष उत्तम कापसे यांनी डॉ आंबेडकर पुतळ्यास पुष्प अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. डॉ. आंबेडकरांच्या चरित्रावर प्रकाश टाकून त्यांचे विचार आत्मसात करण्याचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास व्यापारी अरविंद चौरगडे, प्रसान थूल, सुनील धोटे, नितीन गोलाईट, आशिष गजभिये, आशिष धांडोळे, गुड्डू पाटील, कुबेरा आदी उपस्थित होते.
युवा जागृती मंडळाने हा कार्यक्रम आयोजित केला होता. डॉ. आंबेडकर पुतळ्याला पुष्प अर्पण करुन पूजा करण्यात आली. विक्की शेंडे सचिव, युवा जागृती मंडळ आंबेडकरांनी शिक्षण आणि राज्यघटनेच्या प्रेरणेने नव्या पिढ्यांना दिलेली संजीवनी यावर प्रकाश टाकला. शहरातील डॉ आंबेडकर पुतळा व त्यांच्या घरी महानिर्वाण दिन साजरा करण्यात आला.