* कन्हानच्या विकास कार्यवर भर देणार
*भाजपा ओबीसी आघाडीचे महामंत्री रामभाऊ दिवटे यांच्या वतीने सत्कार
कन्हान ता.10
काही वर्षांपूर्वी कन्हान शहरात विविध प्रकारातील उद्योग कार्यरत होते. तेव्हा शहरात सोन्याचा धूर निघत होता. आज येथील अवस्था डबघाईस आली आहे. या शहराला पुन्हा एकदा गतकाळातील वैभव मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत, अशी भूमिका आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी मांडली.
शनिवार ८ जानेवारी २०२२ रोजी कन्हान येथे भाजपा ओबीसी आघाडीचे महामंत्री रामभाऊ दिवटे यांच्या वतीने आयोजित सत्कार सोहळ्यात ते बोलत होते.
याप्रसंगी माजी आमदार डी. मल्लिकार्जुन रेड्डी, शंकर चहांदे, आशिष रामभाऊ दिवटे, सुनंदा रामभाऊ दिवटे, अतुल हजारे, डॉ. मनोहर पाठक, व्यंकटेश कारेमोरे, सुनिल लाडेकर, रिंकेश चवरे, सौरभ पोटभरे, शैलेश शेळके, पारस यादव, लोकेश आंबाडकर, आकाश वाढणकर, सावन मस्के, स्वाती पाठक, तुलेशा नानवटकर, सुषमा मस्के उपस्थित होते. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत चंद्रशेखर बावनकुळेविजयी झाले. त्यांनी मुंबईत विधानपरिषद सदस्य म्हणून शपथ घेतल्यानंतर प्रत्येक नगर परिषदेला भेट देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. त्यानुसार शनिवारला त्यांनी कन्हान नगर परिषदेतील नगरसेवकांची भेट घेत त्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. याच बैठकीनंतर त्यांनी भाजपाचे ज्येष्ठ नेते रामभाऊ दिवटे यांनी आयोजित केलेल्या सत्कार सोहळ्यात उपस्थित झाले. यावेळी रामभाऊ दिवटे, आशिष दिवटे तथा सुनंदा दिवटे यांनी त्यांचे स्वागत केले. कन्हान शहराचा कायापालट व्हावा याकरिता आपण उद्योग आणण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी रामभाऊ दिवटे यांनी केली.