केळवद : जागतिक महिला दिन निमित्ताने पोलीस स्टेशन केळवद येथे मा . नायब तहसिलदार श्रीमती दराडे मैडम तहसित कार्यालय सावनेर यांना आंमत्रित करन पोलीस स्टेशन केळवद येथील ग्राऊंडवर जागतिक महिला दिन निमित्ताने कार्यक्रम घेण्यात आला असुन पो.स्टे . परिसरातीत महिला पोलीस पाटिल , महिला सरपंच , महिला दक्षता समिती सदस्य , महिला होमगार्ड सैनिक , आशा वर्कर , ग्राम रक्षक दत महिला सदस्य , तसेच परिसरातील कर्तृत्ववान महिलांना आंमत्रित करुन सर्वांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले .
सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा . नायब तहसिलदार श्रीमती दराडे मैडम तहसिल कार्यालय सावनेर यांनी स्वीकारले . व कार्यक्रमाला उपस्थित महिलांना आजच्या काळात त्यांची जबाबदारी व भुमिका याविषयी मार्गदर्शन केले . तसेच पोउपनि राठोड पोलीस स्टेशन केळवद यांनी कार्यक्रमाची प्रस्थावना केती असुन कार्यक्रमाचा मुख्य उद्देश समजावुन सांगितला व महिलांनी केलेले कार्य यापुढेही असेच सुरु ठेऊन पोलीस प्रशासनाला मदत करावी . महिलांची आर्थिक जबाबदारी व समाजात विशेष भुमिका त्यांचे अधिकार / कर्तव्य व समाजात त्यांचे स्थान याबाबत मार्गदर्शन केले . तसेच श्री . दिलीप ठाकुर पोलीस निरिक्षक पोलीस स्टेशन केळवद यांनी मार्गदर्शक म्हणुन उपस्थित महिलांना त्यांची जबाबदारी त्यांनी स्वता घडुन मुलांवर चांगले संस्कार करून मुलांना घडवुन माता जिजाऊ . राणी तक्ष्मीबाई . सावित्रीबाई फुले या महिलांचे एक एक गुण अंगीकारुन आपले स्थान समाजात बिंबाविले . तसेच आतापर्यंत पोलीस विभागाला आपले जे मोलाचे सहकार्य लाभले तसेच यापुढेही आपले सहकार्य गहित अशी आशा करून महिलांनी समाजात पुढे येऊन कार्य करावे . ईत्यादी मार्गदर्शन केले .
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मनापोशि अर्चना निकोसे यांनी केले . तसेच पोलीस स्टेशन केळवद येथे तैनातीस असलेले सिनिअर महिला पोलीस अंमलदार मनापोशि अर्चना निकोसे ब.नं. 1770 यांनी जागतिक महिला दिना निमित्ताने पोलीस स्टेशन केळवद चे प्रभारी म्हणुन चार्ज साभांळता . व मपोशि पुनम त्रिपाठी ब.नं. 1009 यांना स्टेशन डायरी अंमलदार , मपोशि हेमलता भागवत ब.नं. 492 यांना वायरलेस डयुटी , मपोशि पोर्णिमा सोनेकर ब.नं. 394 यांना सीसीटीएनएस डयुटी चा चार्ज देण्यात आला असुन सर्व महिला अंमलदारांना मा . अनिल देशमुख गृहमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी दिलेले गुभेच्छा पत्र तसेच पुष्पगुच्छ देऊन सन्मानीत करण्यात आले . जागतिक महिला दिना कार्यक्रम पोउपनि राठोड सा . नापोशि रविन्द्र चटप ब.नं. 1914.मनापोशि अश्विनी निकोसे ब.नं. 1770 यांनी विशेष परिश्रम घेऊन , सोशल डिस्टंसिंग ठेऊन , मास्क व सेनिटायझरचा वापर करून , कोवीह -19 च्या सुचनांचे तंतोतंत पालन करून यशस्वीरित्या पार पाडला .