*ज्या नागरिकांनी नियमाचे उल्लंघन केले, त्यांच्यावर दंड थोटावला व ज्यांनी दंड भरला नाही, अशा नागरिकांवर मालमत्तेवर बोजा वाढविण्यात येईल. त्यांचे दुकाने सील करण्यात येईल,*अर्चना वंजारी* (मुख्याधिकारी,नगर पंचायत पारशिवनी)
कमलसिह यादव
पारशीवनी तालुका प्रातिनिधी
दुकानाची पाहणी करताना मुख्याधिकारी अर्चना वंजारी
पारशिवनी(ता प्र):- राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य शासनाने कठोर नियमावली जाहीर केली आहे. राज्यसरकारने गर्दी टाळण्यासाठी राज्यात कलम १४४ लागू करण्यात आली आहे.
सकाळी ७ ते रात्री ८ वाजतापर्यंत जमावबंदी म्हणजे पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई आहे. त्याअनुसंघाने नगर पंचायत पारशिवनी क्षेत्रात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतीवर असून, आटोक्यात आणण्यासाठी शासनाने निर्गमित केलेल्या नियमावली अंमलबजावणी करण्यासाठी नगरपंचायतकडून मुख्याधिकारी अर्चना वंजारी यांच्या नेतृत्वात विविध उपाययोजनांसह दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.
राज्यात सध्या कलम १४४ लागू केली असून, दिनांक ५ ते ३0 एप्रिलपर्यंत अतिआवश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना आठवडी बाजारासहित बंद ठेवण्यात आले आहे. अतिवश्यक वस्तू व सेवांच्या दुकानातील दुकानदार व कर्मचार्यांची लस होणे गरजेचे आहे. तसेच ग्राहकांकडून स्वत: नियमाचे पालन होते किंवा नाही हे पाहणे गरजेचे आहे. सर्वधार्मिय स्थळे, सलून, सभागृह, जलतरण तलाव व इतर अतिआवश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना बंद ठेवण्यात आले आहे. कर्मचार्यांनी सदर आरटी- पिसीआर टेस्टची निगेटिव्ह प्रमाणपत्र ठेवणे आवश्यक आहे. अन्यथा, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. त्याप्रकारची दवंडी कार्यक्षेत्रात देण्यात आली आहे. त्याअनुसंगाने मुख्याधिकारी अर्चना वंजारी यांनी कर्मचार्यांसह दुकानदारांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
मुख्य बाजारात मोरभी दुकानदार यांनी लसीकरण केले नव्हते. तसेच त्यांच्याकडे आरटी-पिसीआरची निगेटिव्ह प्रमाणपत्र नव्हते. दुकान मालक विजय खिलोशिया, शैलेश खिलोशिया व इतर कर्मचारी यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यांना पाच हजारांचा दंड आकरण्यात आला. तसेच केशव मेडिकल, शिव भोजनालय, महा- ई सेवा केंद्र, अरिहंत किराणा स्टोर्स, भास्कर कावळे, शकील किराणा स्टोर, पालीवाल मेडिकल व गुजरी येथील भाजीपाला विक्रेते या सर्वांकडून एकूण २0 हजारांचा दंड वसून करण्यात आला. तसेच ज्या नागरिकांनी नियमाचे उल्लंघन केले, त्यांच्यावर दंड थोटावला व ज्यांनी दंड भरला नाही, अशा नागरिकांवर मालमत्तेवर बोजा वाढविण्यात येईल. त्यांचे दुकाने सील करण्यात येईल, असा इशारा नगर पंचायत प्रशासने दिली.
यावेळी मुख्याधिकारी अर्चना वंजारी, दत्ता गिलबिले, दिलीप दिगोरे, अनिल कोल्हे, रोशन येरखेडे, धीरज निशाने,महेश भनारकर व इतर कर्मचारी उपस्थित होते.