केमिकल इंजिनीअरिंग विभागात दीक्षा धुंडेले द्वितीय*
*अमरावती विद्यापीठाच्या मेरिट यादीत द्वितीय स्थान पटकावून शहराचे नाव लौकीक केले*
*सावनेर : शहरातील दीक्षा किशोर धुंडेले हिने संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या केमिकल अभियांत्रिकी विभागात अमरावती विद्यापीठात 9•82 गुणांसह द्वितीय क्रमांक पटकावून कुटुंबासह सावनेर शहराचे नाव उंचावले.*
*सावनेर शहरातील ज्येष्ठ पत्रकार किशोर धुंडेले यांची कन्या, जवाहरलाल दर्डा एज्युकेशन सोसायटी, यवतमाळ व्दारे संचलित जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या केमिकल (रसायन) अभियांत्रिकी विभागाची विद्यार्थिनी होती. सन 2021 मध्ये संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या केमिकल विभागातर्फे जाहीर करण्यात आलेल्या निकालात रासायनिक अभियांत्रिकी विभागाच्या गुणवत्ता यादीत दीक्षा किशोर धुंडले सावनेर , मयूर अशोक धोटे चंद्रपूर, हिमांशू दिलीप जुमडे उमरेड जि. नागपूर यांनी 9•82 गुण मिळवले. अमरावती केमिकल विदयापीठात गुण. संयुक्तपणे द्वितीय क्रमांक पटकावला*
*संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावतीने जारी केलेल्या गुणवत्ता यादीत स्थान मिळविलेल्या पाच विद्यार्थ्यांपैकी तीन विद्यार्थी यवतमाळ येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत.या गुणवंत विद्यार्थ्यांचे जवाहरलाल दर्डा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष देवेंद्र दर्डा,सचिव किशोर दर्डा,प्राचार्य रामचंद्र तत्ववादी,विभागप्रमुख प्रा.अजय पारडे यांनी कौतुक करुन त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.*
*याच शहरातील होतकरू विद्यार्थिनी दीक्षा धुंधले हिने आपल्या कुटुंबाचे व शहराचे नाव उजेडात आणले, करणपार विभागाच्या आमदार तथा राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सनीलबाबू केदार यांचे सह आदींनी कु.दीक्षाने प्राप्त केलेल्या सुयशाचे अभिनंदन करुण तिला तीच्या पुढील उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देऊन प्रोत्साहित केले.तर दिक्षाने आपल्या यशाचे श्रेय जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालय प्रबंधन व तेथील प्राचार्य, प्राध्यापक यांचे योग्य मार्गदर्शन तसेच व्यवसायाने शिक्षक असलेले माझे स्व.आजी आजोबा आणि माझ्या कुटुंबातील सर्व सदस्यांकडून मिळालेल्या सहकार्याला दीले.*