वनविभागाच्या निष्काळजी मुळे हरणाचे मरण- संजय सत्यकार
कन्हान,ता.८ जुलै
कन्हान शहरापासून पाच किलोमीटर व नागपूर पासून पंचवीस किलोमीटर अंतरावरील खोपडी (खेडी) शिवारात (दि.८) जुलै रोजी दुपारी बारा ते एक वाजताच्या दरम्यान काही भटक्या कुत्र्यांनी एका हरणाच्या पील्यावर जीवघेणा हल्ला करून गंभीर जख्मी केले.
लक्षात येताच नागरिकांनी तात्काळ धाव घेत हरणाच्या पिल्याला कुत्र्यांच्या तावळीतुन त्याचे जीव वाचवले. त्याला गावातच एका सुरक्षेच्या जागी ठेवून सरपंच रेखाताई वरठी यांनी याची सूचना संजय सत्येकार यांना दिले. तात्काळ याची सूचना वन विभागाच्या नागपूर येथील रेस्क्यू विभागाच्या सेंटर ला दिली. परंतु त्यांचा कडून पाहिजे तसे सहकार्य मिळाले नाही व कसलेही मदत तर दूर परंतु फोनवर बोलतांना मध्येच रेस्क्यू सेंटरच्या कर्मचाऱ्यांनी फोन कट केला. परत फोन केला असता त्यांनी याची गंभीर्ता घेतली नाही. वेळेत उपचार न भेटल्याने ५ वाजताच्या सुमारास तो निष्पाप हरणाचा पिल्लू मेला. तरी सुद्धा वनविभागाचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी आलेले नाही. शासनाने योग्य चौकशी करून अशा बेजवाबदार व निष्काळजी वन विभागाच्या कर्मचाऱ्यावर योग्य ती कारवाई करावी अशी जनतेची मागणी असून प्राणी प्रेमी आणि नागरिकांत मोठ्या प्रमाणात रोष आहे.
Post Views: 706
Thu Jul 13 , 2023
विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे प्रकाश नाईक अध्यक्ष तर रितेश पाटील उपाध्यक्ष सावनेर: होळी चौक येथील प्राचीन पुरातन 100 वर्षांपासूनचे असलेले विख्यात विठ्ठल रुख्मिनी मंदिराचा अध्यक्ष पदी प्रकाश नाईक, तर उपाध्यक्षपदी रितेश पाटील यांची नियुक्ती झाली. स्थानिक पुरातन विठ्ठल रुख्मिनी देवस्थान हे शहरातील एकमेव जागरूक मंदिर आहे.यामंदिराला अंदाजे 7 ते 8 एकर […]