न्यू गुजरखेडी येथील वेलकम लॉजवर धाड
अनैतीक संबंध प्रस्थापीत करून वेश्या व्यवसाय करण्यास केले प्रवृत्त; तीन आरोपींस अटक एक फरार
वेश्या व्यवसायासाठी ठाण्याहून आणल्या महीला ; सावनेर पोलिसांची कारवाई
सावनेर पुढील 10 दिवसास वेश्या व्यवसाय करण्यासाठी ठाणे शहरातून सावनेर जवळील न्यू गुजरखेडी येथील वेलकम लॉजवर आण्यात आलेल्या दोन महीलांसह चार आरोपींना सावनेर पोलिसांनी अटक केली आहे. तपन दत्तात्रय रूषीया (वय 28). धिरज दत्तात्रय रूषीया (वय 32 ) रजत दत्तात्रय रूषीया ( वय31 ) सर्व राहणार मानकर पेट्रोल पंप, राधाकृष्ण हॉल सामोर सावनेर जि. नागपूर व प्रणय विनोद गुडधे रा. इसापुर ह.मु. पाटणसावंगी ता. सावनेर जि. नागपूर अशी आरोपींची नांवे असून यांच्या विरूद्ध गुन्हा नोंदवून आरोपींना अटक करण्यात आली आहे. यातील प्रणय गुडधे फरार आहे.
सावनेर पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार पोलीसांना गुप्त बातमीदारा मार्फत मिळालेल्या माहितीनुसार न्यू वेलकम लॉज गुजरखेडी येथे दि. 7 ऑगस्ट 23 रोजी दुपारी 1.15 वा. पश्चीम बंगाल येथून आलेल्या दोन मुलींची लॉजच्या रजीस्टरवर असलेल्या नोंदी तपासून त्यांना विचारपूस केली असता आरोपी क्र.1. तपन दत्तत्रय रूषीया व 2 धिरज दत्तात्रय रूषीया यांनी दोन्ही पिडीत महीलांना वेश्याव्यवसाय करण्यास पुढील 10 दिवसासाठी आणण्यात आल्याचे सांगण्यात आले. तसेच आरोपी क्र. 1 तपन दत्तात्रय रूषीया व 2 धिरज दत्तात्रय रूषीया यांनी दोन्ही पिडीत महिलांना वेश्या व्यवसाय चालविण्या करिता सावनेर नागपूर ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी आणून वर नमुद पिडीताना वेश्या व्यवसाय करण्यास प्रवृत्त केले. तर रजत दत्तात्रय रूषीया याने आपण भाडेतत्वावर चालवत असलेल्या वेलकम लॉज ची रूम नंबर 103 याचा कुंटणखाना म्हणून वापर करीत होते. फरार आरोपी क्र. 4 याने पिडीतेशी अनैतीक संबंध प्रस्थापीत करून तीला वेश्या व्यवसाय करण्यास प्रवृत्त केल्याचे फिर्यादी मंगला मोकाशे सहायक पोलिस निरीक्षक (पोलिस स्टेशन सावनेर) यांनी दिलेल्या तक्रारी वरून आरोपी क्र. 1 ते 4 विरुद्ध पोस्टे सावनेर येथे अपराध क्र. 707 / 23 अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनीयम 1956 कलम 3(2) (क) 5 (ए) (स) (डी) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधिक्षक विशाल आनंद, अप्पर पोलिस अधिक्षक संदीप पखाले, उप विभागिय पोलिस अधिकारी बापू रोहम, सावनेर पोलिस अधिकारी रविन्द्र मानकर यांच्या मार्गदर्शनात शरद भस्मे, मंगला मोकाशे, सुरेन्द्र वासनिक, सतिश देवकते, ज्योती नेवारे, चालक रविन्द्र लेंडे यांनी केली.
लॉज बंद करा; नागरकिांची मागणी
या लॉजच्या मागे जि.प. ची शाळा असून येथील मुलांवर गंभिर परिणाम होत असल्याने हा लॉज कायमचा बंद करण्याची मागणी परिसरातील नागरिक करीत आहे.