तालुकात पुन्हा घरफोडी.,दहेगाव (जोशी)येथे ४६ हजाराचा माल लंपास
कमलसिंह यादव
पारशिवनी तालुका प्रातिनिधी
पाराशिवनी(ता प्र):- पाराशिवनी तालुकात नव दिवसात पारशिवनी शहर व ग्रामिण क्षेत्रात अवतीभोवती खेड्यात चोरट्यांनी धुमाकुळ घातला असून एका मागे एक चोरीचे घटना सतत घडत आहे. दहेगाव जोशी फिर्यादी हिरालाल श्रावण पिंपळकर या परिवारातील सदस्य घरी झोपले असताना चोरट्यांनी दाराची कडी तोडून दहेगाव येथील यांचे घरी चोरी केली ही घटना ६ अक्टुबर मंगळवारी चे रात्री घडली चोरीचे घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे , घरातील सर्वजण झोपले असताना चोरट्यांनी दाराची कडी तोडून आत प्रवेश केला घरातील कपाटात असलेले सोन्याचे दागिने चोरून नेले अंदाजे ३९००० हजार रुपयांचे दागिने चोरीला गेले हिरालाल श्रावण पिंपळकर यांच्या घरी घडली त्यांचे घरी देखील सर्वजण झोपलेले असताना दाराचे कुंडी कडून फळाने आत प्रवेश केला कपाटातील मध्ये लपवून ठेवलेले सोन्याचे दागिने लंपास केले दागिने अंदाजे किंमत हे ३९००० हजार रुपये आहे ते रोख०७००० सात हजार रुपये रोख असा ४६००० हजार रुपये चोरून गेला चोरीमध्ये हे चोरांनी गुंगी च्या स्प्रे वापर केला होता कारण घरचे सदस्य जेव्हा झोपून उठले तेव्हा त्यांचे डोके जड वाटत होते अशाघर चे सदस्या चे म्हणणे आहे,
पारशिवनी तालुक्यात एका पाठोपाठ एक चोरीची घटना घडत आहे नव दिवसात नव घराची चोरी झाली आहे, कोढासावली, बाबुळवाडा ,पारशिवनी शहर पाठोपाठ आता व दहेगाव जोशी येथे चोरीची घटना २८सेष्टबर ते ६अक्टुबर पर्यत नव दिवसाचे आत मध्ये घडले आहे हे सर्व चोरी घटनांमुळे मुंगी अन्याची स्प्रे वापर करण्यात आलेला आहे अशा संदेह आहे पारशिवनी येथे तर चोरी मागील पाराशिवनी आठवड्यात २अक्टुबर दोन घरी भर दिवसात चोरी करून लोकांना मनात भीती निर्माण केली थोडीशी हिम्मत दिवसेंदिवस वाढत आहे अद्याप एकाही चोरीचा तपास लागलेला नाही त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर ग्रामस्थ प्रश्नचिन्ह निर्माण करीत आहे.