स्थानिय ट्रांसपोर्ट ना टोल फ्री करण्याची मागणी
#) आज ट्रासंपोर्ट मालकांचे श्यामकुमार बर्वे च्या नेतृत्वात टोल नाक्यावर चक्का जाम आंदोलन.
कन्हान : – तारसा रोड चौक कन्हान ते गहुहिवरा- चाचेर मार्गावरून जड वाहतुक बंद करण्याची मागणी मोठ्या प्रमाणात होत असल्याने (दि.३०) सप्टेंबर पासुन गहुहिवरा-चाचेर मार्गावरून जड वाहतुक बंद करण्यात आल्याने कन्हान, कांद्री व कोळसा खदान, टेकाडी च्या स्थानिय (लोकल) ट्रान्संपोर्ट यांना विविध समस्या उत्पन्न झाल्याने ट्रान्संपोर्ट मालकांनी कन्हान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास काळे यांना भेटुन चर्चा करून निवेदन देऊन टोल फ्री करण्याची मागणी केली होती. परंतु मागणी पुर्ण न झाल्याने स्थानिय ट्रान्संपोर्ट मालकांनी आज बोरडा रोड कांद्री टोल नाक्याजवळ कांन्द्री ग्रापं चे उपसरपंच श्यामकुमार बर्वे यांच्या नेतृत्वात चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे.
तारसा रोड चौक कन्हान ते गहुहिवरा- चाचेर मार्गावरून कन्हान शहरातील नागरिक सकाळी व सायंकाळी पायदळ फिरायला (वाॅकिंग) ला जात असुन दिवसभर या मार्ग रस्त्यानी नागरिकांची व वाहनाची चांगलीच वर्दळ असते. अश्यातच तारसा रोड चौक कन्हान ते गहुहिवरा-चाचेर मार्ग रस्त्यानी मागील काही दिवसापासुन कोळसा, रेतीचे ओव्हर लोड १४ चक्का, २० चक्का मोठ मोठे जड वाहतुक सुरु झाल्याने १० ते १२ फुटाच्या मार्ग रस्त्यावर मोठ मोठे गड्डे होऊन रस्ता खराब झाल्याने दैनिय अवस्था झाल्याने नागरिकांची डोकेदुखी वाढुन इतर छोटया वाहनांना, नागरिकांना ये-जा करिता भयंकर त्रास सहन करावा लागत असुन मोठ्या अपघाताची भिती निर्माण झाली होती.
त्यामुळे येथील स्थानिक नागरिकांची गहुहिवरा-चाचेर मार्गा वरून जड वाहतुक बंद करण्याची मागणी मोठ्या प्रमाणात झाल्याने रामटेक क्षेत्राचे आमदार आशिष जयस्वाल यांच्या अध्यक्षतेत नगरपरिषद कार्यालयात सर्वसाधारण बैठकीचे आयोजन करून (दि.३०) सप्टें बर पासुन गहुहिवरा-चाचेर मार्गावरून जड वाहतुक बंद करण्यात आल्याने कन्हान, कांद्री, कोळसा खदान येथील लोकल ट्रान्संपोर्टर यांना विविध समस्या उत्पन्न झाल्याने ट्रान्संपोर्ट मालकांनी कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विलास काळे यांची भेटुन चर्चा करून निवेदन देऊन टोल फ्री करण्याची मागणी केली होती. परंतु मागणी पुर्ण न झाल्याने संपुर्ण स्थानिय लोकल ट्रान्संपोर्ट मालकांनी आज रविवार (दि.१०) ऑक्टोबंर २०२१ ला सकाळी १० वाजता बोरडा रोड कांद्री टोल नाक्या जवळ ग्राम पंचायत कांद्री चे उप सरपंच श्यामकुमार बर्वे यांच्या नेतृत्वात चक्का जाम आंदोलन करण्याचे आयोजन करण्यात आले आहे.