पंचशिल बौध्द विहार व मांग-गारोडी समाज व्दारे धम्म प्रेमीना भोजन वितरण
कन्हान,ता.08 ऑक्टोबर
सम्राट अशोक विजय दिवस व धम्मचक्र परिवर्तन दिना निमित्य नागपुर जबलपुर राष्ट्रीय महामार्गा वरील कन्हान नदी पुल सत्रापुर रोड जवळ पंचशिल बौध्द विहार व मांग-गारोडी समाज सत्रापुर व्दारे धम्म प्रेमींचे स्वागत करून भोजन वितरण करण्यात आले.
बुधवार (दि.५) ला विश्वविजेता सम्राट अशोक विजय दिवस व धम्मचक्र परिवर्तन दिवसा निमित्य पंचशिल बौध्द विहार व मांग-गारोडी समाज सत्रापुर-कन्हान व्दारे नागपुर जबलपुर राष्ट्रीय महामार्गावरून नागपुर च्या ऐतिहासिक दिक्षा भुमी व ड्रगन पँलेश कामठी येथे देश, विदेश आणि विविध राज्यातुन येणा-या धम्म प्रेमींचे राष्ट्रीय महामार्गा वरील कन्हान नदी पुल सत्रापुर रोड जवळ धम्म प्रेमींचे मा.शंकरराव वाघ मारे, माजी जि प सदस्य मा.अंबादास खंडारे, माजी उपाध्यक्ष नगरपरिषद कन्हान मा.डायनल शेंडे, माजी उपसरपंच कैलास भिवगडे, नेवालाल पात्रे, गजेश यादव, उमेश पौनीकर, भगवान भोवते, राजेश गजभि ये, अजय चव्हाण, विजय वाघमारे, नरेश रामटेके, अश्विन गजघाटे, रोडेकर, भुरा पात्रे, विक्की रोडेकर, हरीश रंगारी हयांच्या प्रमुख उपस्थित स्वागत करून भोजन वितरण करण्यात आले. या भोजनदान कार्य क्रमाच्या यशस्वीते करिता केशव पाटील, विलास उके, विराट खडसे, योगेश इंचुलकर, स्वप्नील वाघमारे, प्रकाश शेंडे, पंजाबराव वाघमारे, अनिल वाहणे, प्रवेश भारती, अतुल पात्रे, सतिश शाहु, मुकेश गायकवाड, प्रियांषु वाघमारे, किटु कराने, गंगाधर डोगरे, आदी रेड्डी, रतन मेश्राम, अनुताई वाघमारे, सुनिता रंगारी, सत्यफु ला वाघमारे, करूणा बागडे, वैशाली नारायणे, निर्मला डोगरे, शारदा मेश्राम, नेहा डोगरे सह पंचशिल बौध्द विहार व मांग-गारोडी समाज सत्रापुर च्या पदाधिकारी, सदस्यानी अथक परिश्रम घेतले.
Post Views: 795
Sun Oct 9 , 2022
सिहोरा रेती घाटातुन अवैध वाळु वाहतुक करणारे ट्रॅक्टर ट्राली जप्त विधी संघर्ष बालक सहीत ७ लाख ३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त कन्हान,ता.08 ऑक्टोबर पारशिवनी तालुक्यातील खंडाळा शिवारा गावातील रस्त्या वर अवैधरित्या वाळु वाहतुक करणारा ट्रॅक्टर ट्राली पोलीस निरिक्षक विलास काळे सह सहकर्मी ने रात्री विभागीय गस्त (पेट्रोलिंग) करित असताना […]