सावनेर शहरात “शेतकरी विधेयक ” विरोधात कांग्रेस ,राष्ट्रवादी कांग्रेस ,शिवसेना व शेतकरी संघटना उतरल्या रस्त्यावर*
*सावनेर येथे गांधी चौकात टायर जाळुन केले रास्ता रोको आंदोलन*
*नंतर पोलिसांनी रस्त्यावरुण हटवत ताब्यात घेतले*
सावनेर : गेल्या सप्टेंबर महिन्यात केंद्र सरकारने केलेले तीन कृषीविषयक कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी देशभरातील शेतकरी संघटनांनी आज मंगळवारी भारत बंद पुकारला आहे.
शहर येथे युवक कांग्रेस ,राष्ट्रवादी कांग्रेस , शिवसेना व शेतकारी संघटना यांचे वतीने केंद्र सरकार शेतकरी बांधवाची मुस्कटदाबी करीत आहे, व केंद्र सरकारने ने पारित केलेले शेतकरी विधेयक हे शेतकरी बांधवाच्या हिताचे नाही ते विधेयक शेतकरी बांधवाना मान्य नाही या करीता दिल्ली येथे पंजाब, हरियाणा येथील शेतकरी बांधवाणी तीर्व आंदोलन करीत आहे. केंद्र सरकार बहुमताने असल्यामुळे सरकारणे शेतकरी यांना विश्वासात न घेता हे विधेयक पारित केले आहे आणी ते शेतकरी बांधवाना मान्य नसल्याने पंजाब, हरियाणा येथील हजारो शेतकरी दिल्ल्ली ला रस्त्यावर उतरले आहे. केंद्र सरकार बळाचा वापर करून हे आंदोलन दडपण्याचा मोठा प्रयत्न करीत आहे. जमलेल्या शेतकरी बांधवावर थंड पाण्याचा मारा करीत आहे, तर कुठे बळाचा वापर करीत आहे पण शेतकरी मागे हटण्यास तयार नाही. प्रहार संघटना अध्यक्ष बच्चूभाऊ कडू यांनी या आदोलनाला पाठिंबा दर्शविला असून ते शेकडो कार्यकर्ते घेऊन दिल्ली ला गेले आहे.महाराष्ट्र मधून या आंदोलना ला बराचसा पाठींबा दर्शवीला जात आहे. केंद्र सरकार घेतलेले शेतकरी विधेयक कायदा रद्द करावा याकरिता सावनेर येथे गांधी चौक मध्ये टायर जाळुन केले रास्ता रोको आंदोलन केले.
नंतर पोलिसांनी आंदोलनकारीना रस्त्यावरुण हटवत ताब्यात घेतले.
कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ठाणेदार अशोक कोळी यांनी ठिकठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
या आंदोलनात सावनेर विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष राजेश खंगारे,सा.पं.स. सभापति अरुणाताई शिंदे, उपसभापति प्रकाश पराते, कृ. उ .बा. स .सभापति गुणवंत चौधरी,सा.ता.काँग्रेस अध्यक्ष सतीश लेकुरवाड़े, सा व्यापारी संघ सचिव मनोज बसवार,शिवसेना सावनेर माजी तालुका अध्यक्ष उत्तम कापसे, ना जि यु को अध्यक्ष राहुल सीरिया,उपाध्यक्ष अमोल केने, रामभाऊ उमाटे, गोविंदा ठाकरे,सुनील चापेकर, दीपक बसवार,चंदु बनसिंगे, साहेबराव विरखरे, गोपाल घटे,डोमासाव सावजी,योगेश पाटील, शफीक सैय्यद, सादिक शेख, , सुभाष मछले, नीलेश पटे,दिलावर शेख विनीत केने, मोहन कमाले, मोनु नकाशे, दिगंबर गजभिये,सुरेश केने, अजय आकुलवार, नितिन गोलाइत, सौरभ साबडे,मोंटी शर्मा, विष्णू कोकड्डे
आदि उपस्थित होते.