कोलारा येथे जागतीक समता सप्ताह कार्यक्रम साजरा
चिमूर,ता.९ डिसेंबर
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था बाबुपेठ, चंद्रपूर व समग्र शिक्षा ,समावेशित शिक्षण पंचायत समिती चिमूर यांच्या संयुक्त विद्यमाने गटशिक्षणाधिकारी श्री प्रमोद नाट याच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोलारा येथे दिनांक 3 डिसेंबर 2022 ला जागतीक दिव्यांग समता सप्ताह दिवस साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक विलास सरई तसेच प्रमुख अतिथी म्हणून बबन मडावी हे उपस्थित होते. कार्यक्रमांची सुरूवात दिव्यांगाचे प्रेरणास्थान लुईस ब्रेल व हेलन केलर यांच्या प्रतिमेला माल्यारपन कणून पूजन करण्यात आले त्याच बरोबर शाळेतील दिव्यांग विद्यार्थ्याचे मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु. कांचन मिरे विशेष शिक्षक यांनी केले व सूत्रसंचालन कु. वर्षा वरभे विषय साधनवेक्ति यांनी केले.
कार्यक्रमात उपस्थित सचिन अण्णाजी लुहुरे समावेशित शिक्षण तज्ज्ञ यांची जागतिक दि दिव्यांग दिवस साजरा करण्याचा उद्देश व महत्व काय? या बद्दल मार्गदर्शन केले. दिव्यांगचे प्रेरणास्थान लुईस ब्रेल व हेलन केलर यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकून त्याच्या मार्गदर्शन केले दिव्यांग विद्यार्थी सुद्धा कुठल्याही क्षेत्रात मागे नसुन त्यांच्यामधे सुद्धा सुप्त गुण दडलेले असतात त्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी शाळा स्तरावर 3 डिसेबर ते ९ डिसेंबर हा जागतिक दिव्यांग समता सप्ताह साजरा करण्यात यावा व होणाऱ्या विविध स्पर्धा मधे त्यांना सहभागी करून घ्यावे व त्यांना सुद्धा सामान्य विद्यार्थी प्रमाणे समान संधी, समान हक्क व संपुर्ण सहभाग प्राप्त करून घ्यावी असे मनोगत व्यक्त केले. श्री गजानन काळे समावेशित शिक्षण तज्ञ यांनी विद्यार्थी व पालक यांना समावेशित शिक्षण यांनी समावेशित शिक्षणाविषयी मार्गदर्शन केले सदर कार्यक्रमात जनजागृती करिता प्रभात फेरी काढण्यात आली रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, व लेखन स्पर्धा, घेण्यात आल्या त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करून सर्व विद्यार्थ्यांना चॉकलेट चे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता शाळेतील शिक्षक गभणे सर कु. शेंडे मॅडम यांनी मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमात पालक, अंगणवाडी सेविका, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, गावातील नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कु कांचन मिरे मॅडम यानी करून क्रार्यकमाची सांगता करण्यात आली.
Post Views: 780
Fri Dec 9 , 2022
कोलारा येथे जागतीक समता सप्ताह कार्यक्रम साजरा चिमूर,ता.९ डिसेंबर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था बाबुपेठ, चंद्रपूर व समग्र शिक्षा ,समावेशित शिक्षण पंचायत समिती चिमूर यांच्या संयुक्त विद्यमाने गटशिक्षणाधिकारी श्री प्रमोद नाट याच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोलारा येथे दिनांक 3 डिसेंबर 2022 ला जागतीक दिव्यांग समता सप्ताह दिवस […]