चिमूर तालुक्यात दिंव्याग समता सप्ताह साजरा

चिमूर तालुक्यात दिंव्याग समता सप्ताह साजरा

चिमूर, ता.०९

   समग्र शिक्षा समवेशित शिक्षण पंचायत समिती चिमूर अंतर्गत ३ डीसेंबर ते ९ डिसेंबर ला जागतिक समता सप्ताह साजरा करण्यात आला. तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांना समाजाचा मुख्य प्रवाहात आणण्याकरिता व शिक्षणात टिकुन ठेवण्या करीता पालक, शिक्षक, अंगणवाडी सेविका, समाज, शेत्रीय यंत्रणा  व सवंगडी यांच्या साह्याने जनजागृती करण्यात आली.

   यावेळी गटशिक्षाधिकारी पंचायत समिती चिमूर रुपेश कामडी यांच्या मार्गदर्शनात व उपस्थितीत समग्र शिक्षा समावेशित शिक्षण, गट साधन केंद्र , पंचायत समिती चिमूर व जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा येरखेडा यांचा संयुक्त विद्यमानाने दिंव्यागाबाबत जनजागृती कार्यक्रम घेण्यात आले.

   जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा येरखेडा येथे केंद्र प्रमुख विनोद भोयर यांनी लुई ब्रेल व हेलन केलर यांचा फोटोला हार अर्पण करून प्रतिमेचे पुजन व अभिवादन करण्यात आले. शाळेच्या शिक्षकांच्या हस्ते दिव्यांग विद्यार्थ्यांना पुष्प गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तसेच विद्यार्थी व उपस्थीत गावकरी यांना समावेशीत शिक्षणाची संकल्पणा व त्यांना मिळणाऱ्या सुविधा बाबत माहिती देण्यात आली. त्यानंतर गावात प्रभातफेरी काढून जन जागृती करण्यात आली.

   प्रसंगी शाळेच्या विद्यार्थ्याच्या चित्रकला स्पर्धा, गायन स्पर्धा, रांगोळी स्पर्धा व विविध खेळ घेण्यात आले. विजेते विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. कार्यक्रमात विनोद भोयर केंद्र प्रमुख जामगाव तथा मुख्याध्यापक, समावेशीत शिक्षण तज्ज्ञ सचिन अण्णाजी लुहुरे ,समावेशीत शिक्षण तज्ज्ञ गजानन काळे, नरेंद्र काकडे विशेष शिक्षक, अतकरी , दंडारी मॅडम, अमृतकर सर उपस्थित होते, समता सप्ताह याप्रमाणे तालुक्यात साजरा करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

१३ डिसेंबर ला नागपूर विधानसभेवर भव्य कलाकार शाहीरांचा मोर्चा मागण्या मान्य नाही केल्यास साखळी किंवा आमरण उपोषण - शा.राजेंद्र बावनकुळे

Sat Dec 9 , 2023
१३ डिसेंबर ला नागपूर विधानसभेवर भव्य कलाकार शाहीरांचा मोर्चा मागण्या मान्य नाही केल्यास साखळी किंवा आमरण उपोषण – शा.राजेंद्र बावनकुळे नागपूर, ता.०९     भव्य कलाकार शाहीरांचा मोर्चा विविध मागण्यांसाठी हजारो शाहीर कलाकारांच्या उपस्थिती मध्ये विधानसभेवर (दि.१३) डिसेंबर रोजी बुधवार, सकाळी १० वा. धंतोली यशवंत स्टेडियम, दुर्गा मंदीर नागपूर येथून […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta