जुन्या पैशाच्या वादावरून युवका ला धारदार शस्त्राने केले गंभीर जख्मी

जुन्या पैशाच्या वादावरून युवका ला धारदार शस्त्राने केले गंभीर जख्मी

#) युवक गंभीर जख्मी असल्याने मेयो रूग्णालयात उपचार सुरू आहे.

कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत एक किमी अंतरा वर असलेल्या आंबेडकर चौक येथील पंजाब नॅशनल बॅंक समोर जवाहर नगर कन्हान येथे एका आरोपीने जुन्या पैशाच्या वादावरून शिवीगाळ करित धारदार वस्तु ने उजव्या हाताच्या दंडावर व गळ्यावर मारून गंभीर जख्मी केल्याने त्यास उपचार्थ मेयो रूग्णालय नागपुर येथे दाखल करून उपचार सुरू असुन कन्हान पोलीसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
प्राप्त माहितीनुसार शनिवार (दि.८) जानेवारी २०२२ ला रात्री ८:३० ते ९ वाजता दरम्यान आशिष विजयसिंग ठाकुर वय२४ वर्ष राह. गणेश नगर कन्हान हा आपल्या मित्रासह नागपुर जबलपुर राष्ट्रीय महामार्गावर आंबेडकर चौक जवळील पंजाब नॅशनल बँक समोर बसला असता आरोपी गौरव ऊर्फ तेनाली संतोष मधुमटके राह. अशोक नगर कन्हान याने येऊन आशिष ठाकुर ला म्हटले कि “तु ज्यादा बात कर रहा है क्या? ” असे बोलुन जुन्या पैशाच्या वादाच्या कारणा वरून आशिष ठाकुर यास अश्लील शिवीगाळ करून स्वत: जवळील धारदार वस्तुने उजव्या हाताच्या दंडा वर आणि त्यास जिवे ठार मारण्याचा उद्देशाने गळ्या वर मारून गंभीर जख्मी केले. घटनेची माहिती कन्हान पोलीसांना मिळताच पोलीसांनी घटनास्थळी पोहचुन जख्मीला प्रथमोपचारा करिता प्राथमिक आरोग्य केंन्द्र कन्हान येथे नेले असता तेथील डाॅक्टरांनी तपासुन गंभीर जख्मी असल्याने मेयो रुग्णालय नागपुर येथे पाठवुन उपचारार्थ दाखल करून गंभीर युवकावर उपचार सुरू आहे. सदर प्रकरणी कन्हान पोलीसांनी आशिष विजयसिंग ठाकुर तर्फे सरकार व्दारे पो हवा. मोहन शेळके यांच्या तक्रारीवरून आरोपी गौरव ऊर्फ तेनाली संतोष मधुमटके यांच्या विरुद्ध अप क्र ०८/२० २२ कलम ३०७, २९४ भादंवि अन्वये गुन्हा दाखल केला असुन कन्हान पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिक्षक जावेद शेख हे पुढील तपास करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

महामार्ग पोलीस व्दारे नुतन सरस्वती विद्या. व क. महाविद्यालयात रस्ता सुरक्षा नियमाचे मार्गदर्शन

Mon Jan 10 , 2022
महामार्ग पोलीस व्दारे नुतन सरस्वती विद्या. व क. महाविद्यालयात रस्ता सुरक्षा नियमाचे मार्गदर्शन कन्हान : – महामार्ग वाहतुक पोलीस रामटेक, टेकाडी कँम्प व्दारे नुतन सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महावि द्यालय कांद्री (टेकाडी) येथे शिक्षक, विद्यार्थ्याना रस्ता सुरक्षा व वाहतुक नियमाची योग्य माहीतीचे मार्गदर्शन करण्यात आल्याने विद्यार्थ्यानी कार्यक्रमाचा लाभ घेतला. महामार्ग […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta