*गुजरी व शुक्रवारी बाजारात दुकाने लावणा-या गरीब दुकानदारांकडुन बाजार कर वसूली त्वरीत बंद करण्याची मागणी*
#) कन्हान शहर विकास मंच चे नप मुख्याधिकार्यांना निवेदन
कन्हान – कन्हान शहारात दररोज लागणा-या गुजरी बाजर व शुक्रवारी आठवडी बाजार भाजीपाला व इतर सामान विकण्याचे दुकान लावणा-या गरीब दुकानदारांकडुन बाजार कर वसूली करण्याचा ठेका देण्यात आल्याने भाजीपाला व इतर दुकानदारा समोर चांगलेच अडचणी निर्माण झाल्याने कन्हान शहर विकास मंच च्या पदाधिकार्यांनी मंच अध्यक्ष प्रवीण गोडे यांचा नेतृत्वात कन्हान – पिपरी नगरपरिषद चे मुख्यधिकारी गिरीश बन्नोरे यांना भेटुन व या विषयावर चर्चा करुन तसेच एक निवेदन देऊन गुजरी व शुक्रवारी बाजारात दुकाने लावणा-या गरीब दुकानदारांकडुन बाजार कर वसूली त्वरीत बंद करण्याची मागणी केली आहे.
निवेदनात सांगितले कि कन्हान – पिपरी नगरपरिषद द्वारे गुजरी बाजर व शुक्रवारी आठवडी बाजार लावण्याकरिता बाजारात दुकानदारांना चबुत-यांची व दुकाने लावण्याची समुचिक व्यवस्था करुन दिली नसल्याने दररोज गुजरी बाजर व शुक्रवारी आठवडी बाजार नॅशनल हाईवे क्रमांक ०७ वर भरतो . या नागपुर – जबलपुर राष्ट्रीय हाईवे वरुन मोठ – मोठ्या ट्रक व इतर गाड्यांचे सारखे येणे – जाणे सुरु असल्याने मोठ्या अपघाताची दाट शक्यता वाढली आहे . कन्हान – पिपरी नगरपरिषद प्रशासना ने गुजरी बाजर व शुक्रवारी आठवडी बाजार लावण्याकरिता दुकानदारांना कन्हान शहरात पुरेशी व्यवस्था करुन दिली नसल्याने दुकानदार आपली भाजीपाल्याची दुकानें व इतर किरकोळ सामानाचे दुकानें रस्त्यावच लावतात आणि त्यामुळे नॅशनल हाईवे वरील वाहतुकीस नेहमी अपितु दररोजच अडथळा निर्माण होतो . कन्हान येथे रस्त्यावरच गुजरी बाजर व शुक्रवारी आठवडी बाजार भरत असल्याने बाजारात भाजीपाला व इतर सामान विकत घेण्याकरिता येणा-या अनेक लोकांचा आणि तसेच उदरनिर्वाहाचे साधन म्हणुन बाजारात लावित असलेल्या अनेक दुकानदारांचे एक्सीडेंट सुद्धा झाले आहे . या गंभीर विषया कडे नगर परिषद प्रशासनाने त्वरीत उपाय योजना करुन गुजरी बाजर व शुक्रवारी आठवडी बाजाराला त्वरीत सुरक्षित जागा देण्यात यावे व गुजरी बाजार तसेच शुक्रवारी आठवडी बाजारात दुकाने लावणा-या गरीब दुकानदारांकडुन बाजार कर वसूली त्वरीत बंद करावे अशी मागणी कन्हान शहर विकास मंच च्या पदाधिकार्यांनी मंच अध्यक्ष प्रवीण गोडे यांचा नेतृत्वात कन्हान – पिपरी नगरपरिषद च्या मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे .
या प्रसंगी कन्हान शहर विकास मंच अध्यक्ष प्रवीण गोडे , उपाध्यक्ष रुषभ बावनकर , सचिव प्रदीप बावने , हरीओम प्रकाश नारायण , सुषमा मस्के , वैशाली खंडार , पौर्णिमा दुबे , नितिन मेश्राम , माधव वैद्य , मोरेश्वर चकोले , रंणजीत बाबु , संजय रंगारी , अखिलेश मेश्राम , प्रकाश कुर्वे , शाहरुख खान , सोनु खोब्रागडे सह आदि मंच पदाधिकारी उपस्थित होते .