कन्हान, साटक ला २३८ जेष्ठ नागरिकांना कोरोना व्यक्सीन लावल्या

कन्हान, साटक ला २३८ जेष्ठ नागरिकांना कोरोना व्यक्सीन लावल्या.   

#) प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान १४५ व साटक ९३ अश्या २३८ नागरिकांना व्यक्सीन लावल्या. 

कन्हान : – प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान येथे ६० वर्षा वरील जेष्ट व दुर्धर आजाराच्या व्यकतीना कोरोना व्यक्सीन १४५ तर प्राथमिक आरोग्य केंद्र साटक येथे ९३ नागरिकांना अश्या २३८ नागरिकांना व्यक्सीन लावण्यात आल्या. असुन कोरोना प्रतिबंधक उपाय योजना व नियमाची काटेकोर पणे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

        शासनाने (दि.५) मार्च पासुन ६० वर्ष व त्या वरील जेष्ठ नागरिक व ४० वर्षा वरील दुर्धर आजारा च्या नागरिकांना कोरोना विषाणु पासुन बचाव करण्या करिता लस देण्यास शुक्रवार (दि.५) मार्च पासुन सुरूवात करण्या त आली असुन बुधवार (दि.१०) मार्च ला प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान येथे १४५ व प्राथमिक आरोग्य केंद्र साटक ला ९३ अश्या २३८ नागरिकांना व्यक्सीन लावण्यात ़आली. ही कामगीरी प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान चे वैद्यकीय अधिकारी डॉ योगेंद्र चौधरी, डॉ. गोंडाणे मॅडम, सिस्टर माया कंभाले, श्रीमती गाणार, अजय राऊत, के मेश्राम, सुरेंद्र गि-हे, आशिष कोल्हे, सांगोडे, माहुरिया तसेच प्राथमि क आरोग्य केंद्र साटक डॉ प्रज्ञा आगरे, डॉ तिवारी, आयोग्य परिवेक्षक अशोक सोनटक्के, नंदकिशोर डोईफोडे, दामोधर ठोंबरे, उषा चव्हाण, प्रेरणा घोटेकर, कल्पना निमकर, सचिन मानकर, मंगेश खोडे, उईके  आदी परिश्रम करित आहेत. दिवसेदिवस नागपुर जिल्हयात कोरोना चा प्रादुर्भाव वाढत असुन कोरोना लस जरी देणे सुरू झाली तरी नागरिकांनी कोरोना विषाणु प्रतिबंधात्मक शासनाच्या नियमाचे पालन करित मॉस्क लावणे, गर्दी टाळणे, सुरक्षित अंतर ठेवणे, कामानिमित्यच घरा बाहेर निघणे, लक्षणे जाणवल्यास कोरोना तपासणी करून घेणे. आदीचे काटेकोरपणे पालन केल्यास या विषाणुजन्य आजारा वर विजय मिळवता ृयेईल असे आवाहन डॉ योगेंद्र चौधरी व डॉ प्रज्ञा आगरे हयानी केले आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

नागपूर ब्रेकिंग : शहरात १५ ते २१ मार्चपर्यंत पुन्हा लॉकडाउन ; पोलिसांना कडक संचारबंदीचे आदेश

Thu Mar 11 , 2021
नागपूर ब्रेकिंग : शहरात १५ ते २१ मार्चपर्यंत पुन्हा लॉकडाउन ; पोलिसांना कडक संचारबंदीचे आदेश २३ फेब्रुवारी ते ७ मार्चपर्यंत शहरात मिनी लॉकडाऊन करण्यात आला होता . शनिवार व रविवारी बाजारपेठ बंद ठेवण्याचे आदेश नितीन राऊत यांनी मागे केली होती . यानंतर नागपूर जिल्ह्यात १४ मार्चपर्यंत पुन्हा निर्बंध वाढविण्यात आले […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta