वार्षिक जिल्हा स्तरीय मैदानी स्पर्धेत बी.के. सी.पी. शाळा कन्हान उपविजेती
#) विद्यार्थांनी मिळविलेल्या या यशाचे कन्हान परिसरात सर्वत्र कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव.
कन्हान : – नागपुर जिल्हा एथलेटिक्स संघटने च्या वतीने आयोजित जिल्हा स्तरीय मैदानी स्पर्धा ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालय, नागपूर मैदान येथे संपन्न झाल्या. यात बी. के. सी. पी. शाळा कन्हान ने १५९ गुणासह उपविजेते पद प्राप्त केले. शाळेच्या विद्यार्थ्यांनी आपल्या उत्कृष्ट प्रदर्शनाने १४ स्वर्ण पदक,१८ रजत पदक व २० कांस्य पदक मिळ वुन शाळेचा व कन्हान चा नावलौकीक केला.
सोमवार (दि.४) ते शुक्रवार (दि.८) एप्रिल २०२२ दरम्यान जिल्हा स्तरीय मैदानी स्पर्धा ईश्वर देशमुख शा रीरिक शिक्षण महाविद्यालय, नागपूर मैदान येथे पार पडल्या. या जिल्हास्तरीय वार्षिक स्पर्धेत नागपूर जि ल्ह्यातील विविध स्पोर्ट्स क्लब, शाळेतील जवळपास ८०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेतील सर्व विजयी स्पर्धकांना ईश्वर देशमुख शा. शि. महाविद्याल याच्या प्राचार्या डॉ. शारदा नायडु यांचे अध्यक्षेत तर साउथ पॉइंट शाळेचे सचिव श्री देवेन दस्तुरे च्या शुभ हस्ते आणि प्रमुख अतिथी बिझाणी नगर महाविद्यालय चे प्राचार्य डॉ. सुजीत मैत्रे यांच्या उपस़्तित पुरस्कार देण्यात आले. यात बी.के.सी.पी.शाळा कन्हानने १५९ गुणासह उपविजेते पद प्राप्त केले. स्पर्धेतील पांच गटा पैकी तीन गटा मध्ये १४ वर्ष वयोगटातील मुली व १४ वर्ष वयोगटातील मुले तसेच १६ वर्ष वयोगटातील मुले यात बी.के.सी.पी. शाळेतील विद्यार्थांनी प्रथम स्थान प्राप्त केले. शाळेच्या विद्यार्थ्यांनी आपल्या उत्कृष्ट प्रद र्शनाने १४ स्वर्ण पदक,१८ रजत पदक व २० कांस्य पदक मिळविले. विद्यार्थ्यांनी केलेली हि नेत्रदीपक प्रगती खरोखरच अभिमानास्पद आहे. या स्पर्धेतील कामगिरीच्या आधारावर पुणे येथे होणाऱ्या आगामी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी या खेळाडूंची जिल्हा संघात निवड करण्यात येईल.
बी.के.सी.पी.शाळेच्या विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाचे श्रेय विद्यार्थ्यांच्या परिश्रमा सोबतच त्यांचे मार्ग दर्शक शालेय क्रिडा शिक्षक एनआईएस – एएफआई (NIS – AFI) कोच अमित राजेंद्र ठाकुर आणि क्रिडा शिक्षिका सविता तुषार वानखेड़े, रेणु राउत यांना देण्या त येते. विद्यार्थ्यांच्या या घवघवीन यशाबद्दल शाळेचे संचालक मा. श्री राजीव खंडेलवाल, सी.ई.ओ. श्रीमती पुष्पा गैरोला, शाळा समितीचे सर्व मान्यवर सदस्यगण, हायस्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीमती कविता नाथ व प्रायमरी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती जुलियाना राव व सर्व शिक्षकवृंद यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. शकुंतला स्पोर्ट्स अकादमीचे प्रशिक्षक श्री राम चंद्र वाणी यांनी ही बीकेसीपी शाळेतील विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपुर विद्यापीठाचे शारीरिक शिक्षण विभागाचे प्रमुख डॉ. शरद सूर्यवंशी यांनी सुद्धा बी.के.सी.पी शाळेच्या विद्या र्थांचे भरभरून कौतुक व मार्गदर्शन केले. विद्यार्थांनी मिळविलेल्या या यशाचे कन्हान परिसरात सर्वत्र कौतुक करून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.