आज शिक्षण परिषद व सेवापुर्ती सोहळा
#) डॉ.पं.दे.रा.शि परिषदचे म.ज्योतीराव फुले राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार वितरण.
कन्हान : – डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद नागपुर विभाग व्दारे आज शिक्षण परिषद व सेवापुर्ती सोहळा डोणेकर सभागृह कन्हान येथे आयो जित केला आहे. यात शांताराम जळते यांचा भव्य सत्कार आणि शिक्षकांना महात्मा ज्योतीराव फुले राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार २०२२ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
डॉ.पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद महा. नागपुर विभागा व्दारे रविवार (दि.१०) एप्रिल २०२२ ला डॉ पंजाबराव देशमुख यांच्या स्मृती दिना निमित्य डोणेकर सभागृह जे एन रोड कन्हान ता पारशिवनी जि. नागपुर येथे सकाळी ११ वाजता शिक्षण परिषद व सेवापुर्ती सोहळयाचे उदघाटन डॉ.पं.दे.रा.शि.परिष द राष्ट्रीय अध्यक्ष मा. पप्पु पाटील भोयर यांच्या अध्य क्षेत, राष्ट्रीय प्रवक्ते मा श्रीमंत कोकाटे यांचे प्रमुख उप स्थित आणि ग्रामोन्नती प्रतिष्ठानचे अध्यक्ष, माजी खास दार मा. प्रकाश भाऊ जाधव यांचे हस्ते करण्यात येणा र आहे. यावेळी डॉ.पं.दे.रा.शि.परिषदचे प्रदेशाध्यक्ष (प्राथ)- मा लक्ष्मण नेवल, महासचिव सतीश काळे, कार्याध्यक्ष (माध्य)- मा शेषरावजी येलेकर, कार्याध्यक्ष (प्राथ) मा दयानंद जाधव, महासचिव (प्राथ)- सुनिल चव्हाण, उपाध्यक्ष- मा राजेंद्र भोयर तसेच नागपुर जिल्ह्याच्या विविध शिक्षक संघटना प्रमुख पदाधिकारी च्या प्रमुख उपस्थिती संपन्न होणार आहे. याप्रसंगी शिक्षणामध्ये पाठयपुस्तकांची भुमिका महत्वाची या विषयावर राष्ट्रीय प्रवक्ते मा श्रीमंत कोकाटे यांचे मार्गद र्शन लाभणार आहे. मान्यवरांच्या हस्ते डॉ.पं.दे.रा.शि. परिषदचे राज्य उपाध्यक्ष मा शांताराम जळते यांनी नागपुर जि प प्राथमिक शिक्षक, मुख्याध्यापक म्हणुन चांगले विद्यार्थी घडवित सेवा प्रदान करून संघटनेचे ही उत्कृस्ट कार्य केल्याबद्दल त्यांचा सेवापुर्ती पर भव्य सत्कार करून उल्लेखनिय कार्य करणा-या शिक्षकांना महात्मा ज्योतीराव फुले राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार २०२२ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. करिता या शिक्षण परिषद व सेवापुर्ती सोहळयास शिक्षक, शि क्षिकांनी आवर्जुन उपस्थित राहुन कार्यक्रमाचा लाभ घ्यावे असे आवाहन डॉ.पं.दे.रा.शि.परिषद नागपुर विभागीय अध्यक्ष, निंमत्रक संजय निंबाळकर व जिल्हाध्यक्ष नंदलाल यादव हयानी केले आहे.