*कोविड-१९ च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शिष्यवृत्ती परीक्षा स्थगित करावी :*
*अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाची मागणी:* धनराज बोडे
*कन्हान*: पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा वाढत्या कोविड १९ च्या महामारी संकटाच्या पार्श्वभूमीवर या परीक्षा स्थगित करून त्या पूढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाने राज्य परिक्षा परिषदेकडे निवेदनाद्वारे केली आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की महाराष्ट्र राज्यात कोविड-१९ चा संसर्ग झपाट्याने वाढत आहे.त्या पार्श्वभूमीवर सरकारकडून कोविड विषाणूला नियंत्रणात आणण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले जात आहेत. परंतु महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,पुणे कार्यालयाकडून पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या आयोजना संबधी नुकतेच एक पत्र निर्गमित करण्यात आलेले आहे.
सद्यस्थितीत राज्यात कोविडची दुसरी लाट प्रचंड वेगाने पसरत असून जनतेच्या मनामध्ये प्रचंड भिती पसरलेली आहे.याच कारणास्तव महाराष्ट्र शासनाने इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द केल्या असून इयत्ता बारावीच्या परीक्षाही पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत.ही वस्तुस्थिती असतांना शिष्यवृत्ती परीक्षेचे सद्यस्थितीत आयोजन करणे उचित ठरणार नाही.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या कार्यालयाकडून किमान ५०% विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेला प्रविष्ट करण्याचे स्पष्ट निर्देश असताना देखील राज्यातील काही जिल्हा परिषदांनी हे आदेश डावलून १०० % विद्यार्थी या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी प्रविष्ठ केल्यामूळे लाखो विद्यार्थ्यांची ही परीक्षा होत आहे.त्यामुळे कोविड बाबतीतील प्राप्त परिस्थितीचा विचार करता
या शिष्यवृत्ती परीक्षेला स्थगिती मिळावी अशी मागणी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष देविदास बस्वदे, राज्य सरचिटणीस कल्याण लवांडे ,गोपालराव चरडे,रामु गोतमारे,सुनिल पेटकर सुभाष गायधने,ज्ञानेश्वर वंजारी,जिल्हाध्यक्ष धनराज बोडे,सरचिटणीस विरेंद्र वाघमारे ,आनंद गिरडकर, अशोक बावनकुळे,गजेंद्र कोल्हे ,पंजाब राठोड, लोकेश सुर्यवंशी,अशोक डोंगरे,उज्वल रोकडे,आशा झिल्पे,सिंधू टिपरे.आदींनी केली.