कन्हान – पिपरी नगर परिषद पोट निवडणुक करिता उद्या मतदान , सोमवार ला मतमोजणी
महाविकास आघाडी काॅंग्रेस पक्षाचे उम्मेदवार रिंगणात तर भाजपा – शिवसेना (शिंदे गट) महायुतीत फुट
सहा महिन्यासाठी निवडणुक कशाला ? काय सिद्ध करणार
कन्हान,ता. १०
कन्हान – पिपरी नगर परिषद प्रभाग क्रमांक सात सदस्यपदाच्या एका रिक्त जागेसाठी उद्या रविवार (दि.११) ऑगस्ट ला मतदान होणार आहे. या निवडणुकी मध्ये महाविकास आघाडी कडुन काँग्रेस पक्षाचे उम्मेदवार सौ.राखी संदीप परते निवडणुकीत उभी असुन भाजपा – शिवसेना (शिंदे गट) महायुती मध्ये फुट पडल्याने भाजपा पक्षाचे उम्मेदवार नंदकिशोर शंकर श्रीरामे व शिवसेना शिंदे गटाचे उम्मेदवार हिरालाल चंद्रभान नारनवरे निवडणुकी च्या मैदानात उभे आहे.
कन्हान – पिपरी ग्रामपंचायत चे रुपांतर नगर परिषद मध्ये होऊन दहा वर्ष झाली. परंतु नागरिकांचा समस्या सुटल्या नसुन शहराचा सर्वांगीण विकास होतांना दिसुन येत नाही आहे. फक्त निवडणुका आले कि मोठ मोठे राजकीय पक्षाचे नेते लोकांचा दारा पर्यंत जाऊन, गल्लो गल्लीत, प्रभागात बैठका घेऊन नागरिकांना खोटे आश्वासन देऊन मत मागतात. प्रत्येक नागरिक आपल्या शहराचा सर्वांगीण विकासा करिता आपल मत योग्य उम्मेदवाराला देऊन मताचा वापर करतो. परंतु उम्मेदवार निवडुण आले कि, लोकांचा मतांचा अपमान करुन त्यांचा समस्यांचे समाधान करत नसल्याचे चित्र कन्हान शहरात तयार झाले आहे. आज च्या परिस्थिति मध्ये शहरात भरपूर समस्या असुन नगर परिषद मध्ये बसलेले सत्ताधारी पक्ष कुंभकर्णी च्या झोपेत गेला असुन त्यांचे लक्ष वेधन्या करिता विरोधी पक्ष आणि जनप्रतिनिधी आंदोलनाची भुमिका घेतांना दिसुन येत नाही आहे. कन्हान – पिपरी नगरपरिषद च्या होऊ घातलेल्या पोट निवडणुकी मध्ये महाविकास आघाडी कडुन उभे असलेले काँग्रेस पक्षाचे उम्मेदवार सौ.राखी संदीप परते यांचा प्रचार पदयात्रेत महाविकास आघाडी चे मोठे नेते एकत्रित आले होते. या लहान निवडणुकी मध्ये नेते एकत्रित येऊन प्रचार प्रसाराचा यात्रेत सहभागी होऊ शकतात. तर शहराचा सर्वांगीण विकासा करिता आघाडी चे नेते एकत्रित येऊन नगर परिषद प्रशासन आणि सत्तेत बसलेले जनप्रतिनिधि विरोधात आंदोलनाची भुमिका का घेत नाही असा प्रश्न निर्माण झालेला आहे जनतेच्या अनेक दशकांपूर्वी औद्योगिक क्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कन्हान शहरातील नागरिक विकासाची आतुरतेने वाट पाहत आहेत. पण स्थानिक जनप्रतिनिधी च्या भोंगळ राजकारणामुळे शहराचा सर्वांगीण विकासा ला गती मिळाली नाही. परिणामी शहरातील नागरिक अनेक समस्यामुळे त्रस्त आहेत. जनप्रतिनिधी चुनावाचा कामात व्यस्त आहेत मग जनतेने आपल्या समस्या बाबत कोणाला वाचा फोळावे. असा देखील प्रश्न निर्माण झाला आहे . सहा महिन्यानंतर कन्हान – पिपरी नगरपरिषद चे निवडणुक होणार असुन ही निवडणुक कशाला घेतली असे स्थानिक लोकांनी प्रश्न निर्माण केला आहे. दहा वर्षात समस्याचे समाधान झाले नाही ते सहा महिण्यात पुर्ण होणार काय अशा चर्चेला उधाण आले आहे.
उद्या रविवार दिनांक ११ ऑगस्ट ला सकाळी ७ ते ५ वाजता पर्यंत कन्हान – पिपरी नगरपरिषद प्रभाग क्रमांक सात सदस्य पदाच्या एका रिक्त जागेसाठी मतदान होणार असुन सोमवार १२ ऑगस्ट ला मतमोजणी होणार असुन महाविकास आघाडी काँग्रेस पक्षाचे उम्मेदवार सौ.राखी संदीप परते, भाजपा पक्षाचे उम्मेदवार नंदकिशोर शंकरजी श्रीरामे व शिवसेना शिंदे गटाचे उम्मेदवार हिरालाल चंद्रभान नारनवरे या तिघा मधुन कोण निवडणुक जिंकणार या कडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
Post Views: 707
Sun Aug 11 , 2024
एक रुग्ण एक झाड संकल्पना एक हजार झाडे वाटपाचा संकल्प सावनेर ता. : आपण वावरत असलेल्या सामाजिक भावना जोपासात आणि आपल्या अवतीभोवती असलेले वातावरनात चैतन्य निर्मिती तसेच नेहमीच शहरातील व आजुबाजु गावाखेड्यातील गोरगरिबांची हिताचे आणि समाजसेवच्या भावनेतून नेहमीच वेगवेगळी संकल्पना डोक्यात आणून शहरातील खासगी रुग्णालये, आदित्य रुग्णालय, पुण्यनी मल्टिस्पेशालिटी रुग्णालय, […]