* शिस्तबध्य “श्री” चे विसर्जन तिन दिवस शांतेत  * विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.छेरींग दोरजे यांची भेट * प्रतिबंधक उपाय व नियमाचे पालन करीत बाप्पाला निरोप

* शिस्तबध्य “श्री” चे विसर्जन तिन दिवस शांतेत
* विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.छेरींग दोरजे यांची भेट
* प्रतिबंधक उपाय व नियमाचे पालन करीत बाप्पाला निरोप

कन्हान,ता.09 सप्टेंबर

    नदी काठावरील पुरातन काली माता मंदीर कन्हान घाटावर नदीच्या पुर परिस्थितीच्या पाश्वभुमीवर नगरपरिषद, पोलीस स्टेशन व ढिवर समाज सेवा संघटना व्दारे शिस्तबध्य प्रतिबंधक उपाय व नियमाचे पालन करित “श्री” च्या मुर्तीचे विसर्जन बुधवार, गुरुवार आणी शुक्रवार असे तिन दिवस कडक पोलीस बंदोबस्तात शांततेत पार पाडले.


कन्हान नदी काठावरील काली माता मंदीर विसर्जन घाटावर नगरपरिषद कन्हान-पिपरी व्दारे प्रतिबंधक नियम पालन करण्याकरिता घाटावर कटघरे, विद्युत, स्वयंसेवक, माहीती व मदत कक्षासह व्यवस्थित व्यवस्था करण्यात आली होती. तसेच नगर परिषदेच्या नवीन इमारतीचा पटगंणात कृत्रिम तलाव निर्माण करून घरगुती लहान गणेश मुर्तीचे विर्सजन करण्या करिता नगराध्यक्षा व उपाध्यक्ष तसेच सर्व नगरसेवकांनी लोकांना आपले घरगुती गणेश मुर्ती कृत्रिम तलावात विर्सजन करण्याचे आव्हान केले होते.

पोलीस स्टेशन अंतर्गत काली घाट, कन्हान येथे विसर्जनस्थळी ता. 09 सप्टेंबर रोजी मा.विशेष पोलीस महानिरीक्षक साहेब, नागपूर परिक्षेत्र ,नागपुर डॉ.छेरींग दोरजे यांनी भेट देऊन पाहणी केली. सदर वेळी मा.पोलीस उप अधिक्षक गृह संजय पुरंदरे, विलास काळे ठाणेदार पोलीस स्टेशन कन्हान तसेच विजय माहुलकर पो.नि.वा.नि.शा. हे उपस्थित होते. पोलीस मुख्यालयातून पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, पोलीस कर्मचारी, वाहतुक कर्मचारी यांना अतिरिक्त तुकडी मागवण्यात आले होते.

कन्हान पोलीस स्टेशनचा कडक पोलीस बंदोबस्तात ता.7 ते 9 सप्टेंबर च्या रात्री पर्यंत तिन दिवस ढिवर समाज सेवा संघटना जिवन रक्षक पथकाने कन्हान शहर व ग्रामिण परिरातील ३० गावा पैकी सार्वजनिक गणेश मंडळ कन्हान शहर 6, ग्रामिण 12 असे 18 तर घरघुती 700 श्री गणेश मुर्तीचे शिस्तबध्य विसर्जन संपुर्ण मानवाच्या कल्याणार्थ करण्याकरीता भाविक मंडळीने शांततेत १० दिवस मनोभावे पुजा अर्चना करून श्री गणेश मुर्तीचे विसर्जन करण्यात आले.  यावर्षी पेंच व तोतलाडोह धरणे भरून असल्याने दोन्ही धरणाचे दरवाजे उघडुन धरणातील पाण्याचा विसर्ग नदीत होत असल्याने कन्हान नदी पात्रात पुर परिस्थीती लक्षात घेता नगराध्यक्षा सौ.करूणाताई आष्टनकर, उपाध्यक्ष योगेंद्र रंगारी, तहसीलदार प्रशांत सागंडे, पोलीस उपविभागीय अधिकारी मुख्तार बागवान, ठाणेदर विलास काळे, मुख्य अधिकारी मंडळ अधिकारी तलाठी यांनी सुव्यवस्था व कड पोलीस बंदोबस्तात श्री च्या मुर्तीचे सुखरूप विसर्जन करण्याकरीता ढिवर समाज सेवा संघटनेचे जिवन रक्षक पथकास पोलीस विभागा तर्फे टी शर्ट देऊन सन्मान करण्यात आला. श्री गणेश विसर्जन स्थळी ग्रामीण पोलीस अधिक्षक विजय कुमार मगर,अप्पर पो.अधिक्षक गुन्हे शाखा पो.नि.नगराध्यक्षा सौ. करूणाताई आष्टनकर, नगरसेवक व नगरसेविका आदीने भेट दिली.
यशस्वीतेत करिता महसुल विभाग, पोलिस विभाग, नगरपरिषद कर्मचारी, पोलीस अधिकारी व कर्मचारी, होम गार्ड, ढिवर समाज सेवा संघटना कन्हानचे अध्यक्ष सुतेश मारबते यांनी आपली टिम सह भावीभक्ताचे  सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

४ हजारावर निवडणूक केंद्रात रविवारी आधार जोडणी अभियान

Sat Sep 10 , 2022
४ हजारावर निवडणूक केंद्रात रविवारी आधार जोडणी अभिया नागरिकानी बीएलओशी संपर्क साधण्याचे आवाहन नागपूर दि. ९ : रविवारी 11 सप्टेंबर रोजी नागपूर जिल्ह्यातील चार हजारावर निवडणूक केंद्रामध्ये निवडणूक कार्ड सोबत आधार जोडणी अभियानासाठी मोहीम राबविण्यात येणार आहे. याशिवाय नव मतदारांना नोंदणी करणे, नाव वगळणे, यासाठी सुद्धा प्रत्येक केंद्रावर कर्मचारी रविवारच्या […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta