संताजी जगनाडे महाराज जयंती भाजप कामठी कार्यालयात उत्साहात
कामठी,ता.८ : डिसेंबर
श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची ३८८ वी जयंती कामठी कार्यालय येथे मोठ्या उत्साहात साजरी केली. अध्यक्षस्थानी भाजप कामठी शहर अध्यक्ष संजय कनोजीया होते. प्रमुख पाहुणे म्हणून लालसिंह यादव, रामसिंह यादव, प्रीतीताई कुल्लरकर, लालू यादव, पुष्पराज मेश्राम उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व संताजी महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून झाली.
यावेळी महाराजांच्या जयंतनिमित्त शाहीर राजेंद्र भीमराव बावनकुळे यांनी त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकतांना सांगितले की, संत संताजी जगनाडे महाराज आपल्या पारंपारिक व्यवसायात तेल गाळण्यास सुरवात केली. आपल्या वडिलांना व्यवसायात मदत करू लागल्याने वयाच्या १२ व्या वर्षीच यमुनाबाईशी विवाह झाल्याने संसाराच्या बेडीत अडकले. त्यामुळे संपूर्ण लक्ष्य फक्त कुटुंबावरच लागले. त्या काळी संतांचे समाजाला कीर्तन, अभंगांच्या माध्यमातून शिकवण देण्याचे कार्य चालू होते. तेव्हा संत तुकाराम महाराजांची ख्याती संपूर्ण महाराष्ट्रात झाली होती. असेच एकदा संत तुकाराम महाराज संतांजीच्या गावी कीर्तनासाठी आले होते. तिथे संत तुकारामांचा प्रभाव संतांजीवर खूप मोठ्या प्रमाणावर पडला व त्यांनी संसार सोडण्याच्या निर्णय घेतला. संत तुकारामांनी संताजीना समजावून सांगितले की, संसारात राहूनही परमार्थ साधता येतो. तेव्हा पासून संत संताजी जगनाडे महाराज ( सन्तु तेली ) हे संत तुकारामाच्या टाळकऱ्यातील प्रमुख टाळकरी म्हणून ओळखले जावू लागले. संत तुकारामांच्या सावलीत राहून त्यांनी तुकारामांची अभंगे लिहिण्यास सुरवात केली.
संत तुकाराम महाराज यांचा जसा लोकांवर प्रभाव वाढत जात होता. ते त्या काळातील काही भटांना सहन होत नव्हता. त्यामुळे त्यांच्या व्यवसाय कमी होत होता संत श्री तुकारामांनी लिहिलेल्या अभंगांची गाथा इंद्रायणी नदीमध्ये बुडवून नष्ट करण्याचा प्रयत्न केला. परंतु , संत तुकारामांचे सर्व अभंग हे संताजी महाराजांना मुखोत्गत पाठ होते म्हणून त्यांनी ते पुन्हा लिहून काढले. “संत तुकाराम महाराज ” यांचे क्रांतिकारी विचार पुन्हा लिहून सामाजिक क्रांति करणारे ” थोर संत संताजी जगनाडे महाराज” यांच्या जयंतनिमित्त शाहीर राजेंद्र भीमराव बावनकुळे यांनी जीवनावर प्रकाश टाकला.
यावेळी भाजप कामठी शहर अध्यक्ष संजय कनोजीया, लालसिंह यादव, रामसिंह यादव, प्रीती ताई कुल्लरकर, लालू यादव, पुषप्रराज मेश्राम, प्रतीक पडोळे, ओमकार बावनकुळे, संजय करंडे, योगेश गायधने, सौ.मानवटकर, झंझाल, अजीज हैदरी, ओमप्रकाश बावनकुळे, सुनील चौहान, अरुण राजगिरे कार्यकर्ते व असंख्य समाज बांधव उपस्थित होते.