राष्ट्रीय युवा दिवसाच्या अनुषंगाने सावनेर मध्ये विदर्भ स्तरीय स्केटींग स्पर्धा पार पडली.
सावनेर : विदर्भ स्तरीय स्केटिंग स्पर्धेचे आयोजन आयकॉन स्केटिंग अकॅडमी द्वारा करण्यात आले.
त्यामध्ये विदर्भातील नामवंत संघटनेच्या स्केटर्सनी सहभाग घेतला होता.
त्यामध्ये सावनेर, काटोल,नागपूर,रामटेक,वरूड, वर्धा,चंद्रपूर,उमरेड येथून आलेल्या स्केटर्सनी सहभाग नोंदवला.
सदर स्पर्धेचे आयोजन आयकॉन स्केटिंग अकॅडमी चे हेड कोच व अंतरराष्ट्रीय स्केटर कुणाल रमेश बेले यांनी केले.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून रोलर स्केटिंग असोसिएशन सावनेर चे अध्यक्ष डॉ.रेव्ह.मार्क साखरपेकर सर, व्यापारी संघटनेचे उपाध्यक्ष मनोजजी बसवार , पवनजी जयस्वाल , डोमासाव सावजी, दीपक कटारे ,दीपक बसवार, विजय पांडे , लक्ष्मीकांत दिवटे, शफीक सय्यद , सादिक शेख, गोपाल घटे ,रितेश पाटील, किशोर धुंडेले, तालुका क्रीडा संकुलाचे व्यवस्थापक प्रा.डॉ योगेश पाटील प्रमुख पाहुणे म्हणून कार्यक्रमाला उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन मिनाक्षी कुणाल बेले यांनी केले.सदर स्पर्धेचे पंच म्हणून रोलर स्केटिंग कोचेस असोसिएशनचे अध्यक्ष गजेंद्र बनसोड ,सचिव मनीष बैसवारे , रुपल टाले, तन्मय पिंपळे, प्रतिक लिंगायत, विद्यापाल नाईक, किशोर ढोरे ,सुधीर कडू व रवींद्र नारनवरे पियूष शिरपुरकर,यांनी केले.स्पर्धेला यशस्वी पणे पार पाडण्यामध्ये जोशुआ साखरपेकर,अमन चव्हाण, चिराग मेंढे, सूरज मेटांगले, प्रतीक चिचखेड़े, सुभाष रॉय यांनी परिश्रम घेतले.