तेली समाज पंच कमेटी द्वारे संत जगनाडे महाराजाना अभिवादन
कन्हान,ता.११ जानेवारी
कन्हान-कांन्द्री परिसरात संत जगनाडे महाराज यांचा पुण्यतिथी निमित्य त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पित करुन विनम्र अभिवादन करण्यात आले.
तेली समाज पंच कमेटी द्वारे संत जगनाडे महाराज यांचा पुण्यतिथी निमित्य कार्यक्रमाचे आयोजन संताजी सभागृह मंदिरात करण्यात आला. कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित संस्थेचे अध्यक्ष शरद डोणेकर यांचा हस्ते संत जगनाडे महाराज यांचा प्रतिमेला पुष्प हार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. यावेळी कांद्री ग्रा.पं.माजी सदस्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी जगनाडे महाराज यांचा जीवन प्रवासांवर उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमात उपस्थित नागरिकांनी जगनाडे महाराज यांचा प्रतिमेला पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन केले.
तसेच हनुमान मंदिर कांद्री संत जगनाडे महाराज यांचा पुण्यतिथी निमित्य कार्यक्रमाचे आयोजन करून कार्यक्रमास प्रामुख्याने उपस्थित परमात्मा एक मंडळ कांद्री अध्यक्ष रामभाऊ सावरकर यांच्या हस्ते जगनाडे महाराज यांचा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. यावेळी कांद्री ग्रा पं माजी सदस्य प्रकाश चाफले, सामाजिक कार्यकर्ता संकेत चकोले यांनी जगनाडे महाराज यांचा जीवन चिरित्र्या वर उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमास उपस्थित नागरिकांनी जगनाडे महाराज यांचा प्रतिमेला पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन केले. याप्रसंगी वामन देशमुख, अशोक हिंगणकर, पतिरामजी देशमुख, ईश्वर काबळे, रविंद्र काबळे, सुरेंद्र पोटभरे, विजय आकरे, विक्रम वांढरे, लक्ष्मीकांत गिरडकर, शिवा चकोले, मनोज भोले, प्रशांत देशमुख, धनराज ढोबळे, लोकेश वैद्य, रोहित चकोले, श्याम मस्के, नाना आकरे सह नागरिक बहु संख्येने उपस्थित होते.
Post Views: 645
Fri Jan 12 , 2024
माजी जिल्हा उपाध्यक्ष डोणेकर यांच्या तत्परतेने श्रीराम मंदिराची रंगरंगोटी कन्हान,ता.११ जानेवारी कन्हान शहर हद्दीतील सत्रापूर, खंडेलवाल नगर संकुलात असलेल्या या मंदिरात एकेकाळी स्थानिक नागरिकांसह व इतर भागातील नागरिकांसह हजारो लोक श्रीराम-जानकीचे दर्शन घेण्यासाठी येत असत. कालांतराने कंपनी व्यवस्थापनाने कंपनी बंद केल्याने हे मंदिरही बंद पडले. त्यामुळे संपूर्ण मंदिर परिसर […]