नागपूर ब्रेकिंग : शहरात १५ ते २१ मार्चपर्यंत पुन्हा लॉकडाउन ; पोलिसांना कडक संचारबंदीचे आदेश
२३ फेब्रुवारी ते ७ मार्चपर्यंत शहरात मिनी लॉकडाऊन करण्यात आला होता . शनिवार व रविवारी बाजारपेठ बंद ठेवण्याचे आदेश नितीन राऊत यांनी मागे केली होती . यानंतर नागपूर जिल्ह्यात १४ मार्चपर्यंत पुन्हा निर्बंध वाढविण्यात आले होते .
नागपूर : शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे . रोज १,२०० ते १,६०० जवळपास रुग्ण आढळून येत आहे . यामुळे कोरोनाने पुन्हा डोकं वर काढल्याचे आकडेवारीवरून दिसून येत होते . ही स्थिती आटोक्यात आणण्यासाठी नागपूर शहरात १५ ते २१ मार्चपर्यंत लॉकडाऊन राहणार असल्याची घोषणा पालकमंत्री नितीन राऊत गुरुवारी पत्रकार परिषदेत केली .
मागील काही दिवसांपासून शहरात कोरोना रुग्णांची संख्या शहरात मोठ्या प्रमाणात वाढत आहे . काहीही केल्या यावर नियंत्रण मिळवण्यात प्रशासनाला यश आलेले नाही . नागरिकही बिनधास्त शहरात वावरताना दिसत आहे . लग्न समारंभ , खाजगी कार्यक्रमात नागरिकांची गर्दी चांगलीच वाढली आहे . यामुळे कोरोना चांगलाच पसरत आहे . अधिक माहितीसाठी- उन्हाळ्यात घ्या पावसाळ्याचा आनंद , प्रादेशिक हवामान विभागाचा इशारा यामुळे २३ फेब्रुवारी ते ७ मार्चपर्यंत शहरात मिनी लॉकडाऊन करण्यात आला होता . शनिवार व रविवारी बाजारपेठ बंद ठेवण्याचे आदेश नितीन राऊत यांनी मागे केली होती . यानंतर नागपूर जिल्ह्यात १४ मार्चपर्यंत पुन्हा निबंध वाढविण्यात आले होते . नागपुरातील भयावह स्थितीवर महत्त्वाची बैठक पालकमंत्री नितीन राऊत यांनी घेतली . या बैठकीला विभागीय आयुक्त , जिल्हाधिकारी , मनपा आयुक्त , मेडिकल , मेयो रुग्णालयाचे अधिष्ठाता आणि आरोग्य विभागाच्या अधिकारी उपस्थित होते . यानंतर शहरात लॉकडाऊन लावण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला .
हे राहतील सुरू व बंद
• अत्यावश्यक सेवा सुरू राहतील भाजीपाल्याची दुकाने सुरू राहील
• खाजगी कार्यालय बंद
• सरकारी कार्यालय २५ टक्केच उपस्थिती
• उद्योग सुरू राहतील बँक पोस्ट ऑफीस सुरू राहतील
• दारू दुकान बंद , ऑनलाइन सुरू
• खाद्य पदार्थ घरपोच राहील
• लसीकरण सुरू राहील लोकप्रतिनिधींनी जाण्या येण्याची सोय करावी गृहविलगीकरण असल्याची तपासणी बाहेर दिसताच कारवाई
• डोळे रुग्णालय व चष्याची दुकाने सुरू राहील • २१ पूर्वी पुन्हा बैठक
• आमदार निवास विलगीकरण केंद्र
पोलिसांना कडक संचारबंदीचे आदेश नागपूर शहरात कोरोनाबाधितांची संख्या एक लाख ६२ हजारांवर पोहोचली आहे . यामुळे १५ ते २१ मार्चपर्यंत शहरात लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे . या दरम्यान विनाकारण नागरिक रस्त्यांवर फिरताना दिसल्यात कारवाई करण्यात येणार आहे . यामुळे पोलिसांना कडक संचारबंदीचे आदेश देण्यात आले आहेत .