भक्तगणांची दर्शनासाठी दरबारात हजेरी; ध्वजाजवळ बाबा प्रकट झाल्याची चर्चा
वाकीत ताजुद्दीन बाबांच्या पदचिन्हांचे झाले दर्शन
सावनेर : तालुक्यातील वाकी येथे ताजुद्दीन बाबांचा प्रसिद्ध दरबार आहे. येथे चमत्कारांची कधीच कमतरता नाही. आजही येथे चिंचेचे झाड आहे, ज्याच्या खाली बाबांनी 12 वर्षे घालवली होती. वाकी वाकी दरबार यथे 8-8-2024 ला पाहाटे 4 चा आरती नंतर श्री संत ताजुदृदीन बाबा यांचे चरण पाउल दिसुन आलेले आहे आता पण ते उमटलेले आहे तर पाऊलांचे दर्शन घेण्या साठी भाविकांचि गदी॔ दिसुन आली आहे.
दर गुरुवारी भाविकांची हजारोनी गर्दी असते.मिळालेल्या माहितीनुसार अशात अचानक भक्तांना दर्गा परिसरात बाबांच्या पदचिन्हाचे दर्शन झाले. सुरुवातील भक्तांना काही कळेनासे झाले, पदचिन्ह पुसल्या जाऊनही मिटत नव्हते. बाबा प्रत्यक्षात दरबारा समोरील ध्वजाजवळ प्रकट झाल्याचे बोलले जात आहे. गुरुवारी (दि.8) पहाटे 4.30 वाजता दम्यांतील सेवाधारी महिला परिसर स्वच्छ करण्यासाठी आल्या. त्यांना तेजस्वी पदचिन्ह दिसून आले. हे पदचिन्ह वारवार पुसण्यात आले. पण, ते मिटत नव्हते. काही वेळाने दरबारात भाविक येऊ लागले आणि ही माहिती दरबाराचे विस्वस्त डाहाके पाटील यांना देण्यात आली. बाबांच्या पदचिन्हाचे वृत्त परिसरात वाऱ्यासारखे पसरले. पदचिन्ह पाहण्यासाठी भाविकांची गर्दी होऊ लागली, दरबारातील या चमत्काराची शुक्रवारी दिवसभर सोशल मीडियावर चर्चा होती.
*पादुका आणि पदचिन्ह देखील 11 इंच*
परिसरात बाबांचे पदचिन्ह दिसून आले असून त्याचा आकार 11 इंच आहे. शिवाय दरबारातील बाबांच्या पादुकांचा आकार सुद्धा 11 इंच आहे. 8 ऑगस्टला बाबांच्या पदचिन्हांची संख्याही 8 होती. करीता भक्तगण याकडे चमत्काराच्या दृष्टीकोनातून बघत आहेत. या पदचिन्हे पाहण्यासाठी भक्तगण दरबारात गर्दी करून पदचिन्हाची पूजा करीत आहेत.
गरजू कुटुंबांना घरकुल योजना देऊन न्याय द्या- आकाश महातो उपविभागीय अधिकारी व नगरपरिषद मुख्याधिकारी यांना निवेदन कन्हान,ता.११ कन्हान-पिपरी नगरपरिषद अंतर्गत प्रभाग क्र.६ पिपरी येथील गरजू कुटुंबांना घरकुल योजना देऊन न्याय द्या अशी मागणी युवा नेते आकाश महातो व शिष्टमंडळाने यांनी उपविभागीय अधिकारी रामटेक वंदना सौरंगपते व कन्हान पिपरी नगरपरिषद […]