गरजू कुटुंबांना घरकुल योजना देऊन न्याय द्या- आकाश महातो
उपविभागीय अधिकारी व नगरपरिषद मुख्याधिकारी यांना निवेदन
कन्हान,ता.११
कन्हान-पिपरी नगरपरिषद अंतर्गत प्रभाग क्र.६ पिपरी येथील गरजू कुटुंबांना घरकुल योजना देऊन न्याय द्या अशी मागणी युवा नेते आकाश महातो व शिष्टमंडळाने यांनी उपविभागीय अधिकारी रामटेक वंदना सौरंगपते व कन्हान पिपरी नगरपरिषद मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
कन्हान-पिपरी नगरपरिषद अंतर्गत प्रभाग क्र.६ पिपरी येथे अनेक वर्षपासून मोठया प्रमाणात मागासवर्गीय गरीब वर्ग राहते. हाथमजुरी करून परिवाराचे संगोपन करणाऱ्या या कुटुंबियांचे माती कवेलू चे कच्चे मकान आहे. पावसामुळे, कोयला खदानिच्या दगाणीमुळे व कन्हान नदीला येणाऱ्या पुरा मुळे नागरिकांचे घर पडून केव्हाही जीवितहानी होण्याची शक्यता वाढली आहे.
पाऊसाळ्यात घरात पाणी शिरून कुणी ‘घर देता का घर’ साठी भटकंती करावी लागते. जिल्हा परिषदच्या शाळा, समाजभवन व अंगणवाडी च्या ठिकाणी अशा परिवाराची सोय करण्यात येते. दरवर्षी होणारा हा प्रकार बघणाऱ्यांसाठी ही अत्यंत्त वेदना दायी असते. तर बेघर कुटुंबातील चिमुकल्यांचे ओरडणे, झोपेचे सोंग घेणाऱ्या प्रशासनाच्या कानावर ही येत नाही. ज्यामुळे शासनाच्या अनेक योजने पैकी घरकुल योजना पासून अजूनही मोठ्या प्रमाणात गरीब वर्ग वंचित आहेत.
हा प्रकार गोर गरिबांवर होणारा अत्याचार आहेत. तरी या गंभीर बाबीबर प्रशासनाने विशेष लक्ष्य देऊन घरकुल योजनेच्या माध्यमातून गरीब कुटुंबियांना न्याय देण्याची मागणी केली आहे. तसेच प्रभाग क्रमांक ६ पिपरी येथील वाचनालय इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असून ह्यामध्ये तरुण- तरुणींना पुस्तिका, टेबल, खुर्ची, पंखा लाईट इत्यादी ईलायब्ररी सारखी सुविधा उपलब्ध करुन द्यावे अशी मागणी उपविभागीय अधिकारी रामटेक वंदना सौरंगपते, मुख्यधिकारी रवींद्र राऊत यांच्याशी चर्चा करून व निवेदनाच्या माध्यमातून आकाश महातो, प्रशांत मसार, रवी मेश्रांम, खुशाल सायरे, संजय सहारे, किसन बर्वे, कुंदन रामगुंडे आदींनी मागणी केली.
Post Views: 676
Sun Aug 11 , 2024
शेतक-यांची नावे नुकसान भरपाई यादीत समाविष्ट करण्याची मागणी कन्हान, ता.११ डुमरी (कला) येथील शेतक-यांच्या शेतातील धान पिकाचे अवकाळी पाऊसाने मोठया प्रमाणे नुकसान झाले. तेव्हा निवडक शेतक-यांचे नुकसान भरपाई यादीत नावे असुन बहुतेक शेतक-यांचे नावे नसल्याने मौका चौकसी करून शेतक-यांचे नावे समाविष्ट करून नुकसान भरपाई मिळवुन देण्याची मागणी तहसिलदार […]