पुरग्रस्ताना त्वरित विविध घरकुल योजनेत घर बांधकाम करून द्या
#) पिपरी नांगरिकांची मा. मुख्याधिकारी यांना निवेदनाने मागणी.
कन्हान : – पेच व तोतलाडोह धरण तुडुंब भरल्याने धरणाच्या पाण्याच्या विसर्गाचा महापुराने शुक्रवारी मध्यरात्री दीड वाजेपासुन पिपरी गावाचे पुराच्या पाण्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या पुर ग्रस्ताच्या कुंटूबीयांना विविध घरकुल आवास योजने अंतर्गत त्वरित घरे बांधकाम करून द्या.अशी मागणी कन्हान पिपरीचे प्रशांत बाजीराव मसार व माजी ग्रा प सदस्य नरेश सोनेकर यानी नगरपरिषद मुख्याधिकारी ना निवेदन देऊन केली आहे.
मध्यप्रदेशात अतिवृष्टीने चौराई धरणा च्या पाणलोट वाढल्याने तोतलाडोह व पेंच धरणाचे सर्व दरवाजे एकाएक उघडुन शुक्रवारी मध्यरात्री पाण्याचा विसर्ग केल्याने पेच व कन्हान नदीला महापुर आला. कन्हान-पिपरी नगरपरिषद व प्रशास नाने दवंडी किंवा सतर्कतेची माहिती न दिल्याने मध्यरात्री दीड वाजता पासुन पिपरी गावाला लागुनच वेकोलि खुली कोळसा खदानच्या माती डम्पींगच्या कृत्रिम टेकडयामुळे पुराचे पाणी पिपरी गावात शिरून नागरिकांची चांगलीच फजिती व नुकसान झाले. स्थानिय जनप्रतिनिधी व समाजसेवी नागरिकांनी घरे बुडावेल्या कुटुंबाचा जीव वाचवुन सुरक्षित ठिकाणी ठेवण्यास मदत केली. नागरिकांच्या घरातील जिवनावश्यक अन्नधान्य, वस्तु पुरा त बुडुन वाहुन गेले. या पुरामुळे अनेक घरे कोसळल्याने नागरिकांचे भयंकर नुकसान झाले. पिपरीचे पुरग्रस्त ज्यांची घरे धराशायी झाले ते कुंटूब उघड्यावर जिवनव्यापन करीत आहे. त्यांची प्रशा सकीय पाहणी करून त्वरित विविध घर कुल आवास योजने अंतर्गत घरे बांधका म करून देण्यात यावी. जेणे करून त्या ना कुंटुबाचे पालन पोषन करून संसारा चा गाडा पुढे नेता येईल. अशी मागणी मा. पालकमंत्री, मा. जिल्हाधिकारी नाग पुर, मा.उपविभागीय अधिकारी रामटेक, मा.तहसिलदार पारशिवनी, मा. मुख्याधि कारी कन्हान आदी ना निवेदना व्दारे कर ण्यात आली आहे. यावेळी पिपरी येथील प्रशांत बाजीराव मसार, नरेश सानेकर, आकाश महातो, अंकुश भोयर, संपत बा वणे, संजय हावरे, नाना खोब्रागडे, शिवा कुर्वे, बंडु मेश्राम, कुणाल खडसे, वृषभ हावरे, रवि मेश्राम, अनिल केवट, अमोल गजभिये,भोला भोयर, मंगेश मेश्राम, आ नंद भुरे, राजु चौरे, सुशांत बर्वे, अभिषेक नारनवरे, प्रमोद राऊत, गणेश बागडे आ दी गावकरी नागरिक प्रामुख्याने उपस्थि त होऊन न्यायीक मागणी केली आहे.