कल्पेश तरूणाच्या हत्येमुळे कन्हान शहर हादरलं
एकाला संपवल तर पळ काढल्याने दोघांचे प्राण वाचले
कन्हान,ता.10 सप्टेंबर
गणपती विसर्जनाला कन्हान शहरात कडक पोलीस बंदोबस्त असताना बोर्डा रोड वरील भारत पेट्रोलपंप समोर कल्पेश बावनकुळे डी.जे.व्यवसायकांचा दोन अज्ञात युवकांनी दुचाकी थांबवुन रात्रीचा सुमारास धारदार शस्त्राने सपासप वार करुन एकाची निर्घुणपणे हत्या केली. तर दोघांनी घटनास्थळावरून पळ काढल्यामुळे त्यांचा थोडक्यात जीव वाचला. ही घटना समोर आल्याने कन्हान शहरात भीतीचे वातावरण पसरलं आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविवार (ता. ११) सप्टेंबर ला रात्रीच्या सुमारास १२:०० ते १:०० वा. च्या दरम्यान मृतक कल्पेश भगवान बावनकुळे (२८) रा.बनपुरी आपल्या दुचाकी क्र.एम.एच.४९ बीएल ५६२८ वाहनाने नागपुर वरुन डी.जे .चा आॅर्डर पुर्ण करुन मित्र सुरज ढोबळे व जीतेंद्र ढोबळे यांचा सोबत बोर्डा रोड ने बनपुरी गावाकडे जात होता. भारत पेट्रोलपंप समोर दोन अज्ञात युवकांनी आडवे आल्याने कल्पेश बावनकुळे यांने गाडी थांबवली. मृतक व त्याचे मित्र खाली पडल्याने युवकांनी काही न विचारता थेट हल्ला चढवला. कल्पेश बावनकुळे व त्याचे मित्र अॅक्टीवा वाहन सोडून पेट्रोल पंपच्या दिशेने पळाले. युवकांनी कल्पेश बावनकुळे याला पकडून त्याचा शरीरावर धारदार शस्त्राने सपासप वार करुन हत्या केली. सदर घटनेची माहिती कन्हान पोलीसांना मिळताच पोलीस निरीक्षक विलास काळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश मेश्राम, नरेश वरखडे, कोमल खैरे, जितु गावंडे आदि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहचुन पंचनामा करुन मृतदेह आपल्या ताब्यात घेऊन शवविच्छेदना करिता कामठी उपजिल्हा रुग्णालय पाठवले. उपविभागीय पोलीस अधिकारी मुख्तार बागवान, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे आदी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी करुन आरोपीविरुध्द पथक तयार करुन शोध सुरु केला आहे .