*कामठी तालुक्यातील 47 ग्रामपंचायातीच्या सरपंच पदाचे आरक्षण*
कामठी : आज कामठी तालुक्यातील 47 ग्रामपंचायातीच्या सरपंच पदाचे आरक्षण काढण्यात आले.ज्यामध्ये अनुसूचित जाती करिता 8 ग्रामपंचायती, अनुसूचित जमातीकरीता 3 ग्रामपंचायती , नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाकरिता 13 ग्रामपंचायती तर सर्वसाधारण प्रवर्गाकरिता 23 ग्रामपंचायती चा समावेश आहे.
यानुसार अनुसूचित जाती प्रवर्गाकरिता 8 ग्रामपंचायतीची निवड करण्यात आले ज्यामध्ये महालगाव , भुगाव, येरखेडा, आवंढी तर अनुसूचित महिलांसाठी नान्हा, सुरादेवी, नेरी , लिहिगाव चा समावेश आहे.
अनुसूचित जमाती करिता 3 ग्रामपंचायती अनूसुचित जमाती महीलासाठी वारेगाव, खेडो तर अनुसुचित जमाती (खूला)साठी उमरी ग्रामपंचायत चा समावेश आहे.
नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गसाठी 13 ग्रामपंचायती निवडण्यात आल्या 6 खुला व 7 महिला आरक्षित ग्रा प चा समावेश आहे यानुसार नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (खुला)साठी कवठा, आजनी, बिना, रणाळा, टेमसना,परसाड तर नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला साठी जाखेगाव, गुंमथळा, खापा, चिखली, वरंभा, भामेवाडा, घोरपड ग्रा प चा समावेश आहे.तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी निवडण्यात आलेल्या 23 ग्रा प मधील 11 ग्रा प महिला आरक्षित निवड करण्यात आली यानुसार सर्वसाधारण प्रवर्ग (खुला)मध्ये लोंणखैरी, कोराडी, भिलगाव, भोवरी, कढोली, तरोडो (बु),दिघोरो, गारला, वडोदा, आडका, पावंनगाव, चिकना, तर सर्वसाधारण महिला साठी सोनेगाव, गुमथी, खसाळा, खैरो, शिवणी, केसोरी, कापसो (बु), केम, गादा, बिडगाव, बाबूलखेडा चा समावेश आहे.