केरडी शेत शिवारात शेतातील धानाची गंजीची आग लागुन राखरांगोळी
#) शेतक-यांचे दोन लाख रूपयाच्या धानाचे नुकसान.
कन्हान : – पारशिवनी तालुक्यातील कन्हान पोलीस स्टेशन पासुन सात किमी अंतरावर असलेल्या मौजा केरडी गावाजवळील पांजरा रिठी शेत शिवारातील बंडु पतिराम हिगें यांच्या मालकीचे २ हे.३२ आर शेता त पिकविलेल्या धानाच्या गंजीला पहाटे कुणीतरी अज्ञात इसमांने आग लावल्याने धानाची गंजी जळुन राख रांगोळी झाल्याने शेतक-याचा तोंडचा घास हिसकावुन दोन लाख रूपयांचे नुकसान झाले.
शेतकरी बंडु पतिराम हिंगे राह. निमखेडा यांचे केरडी गावा जवळील पांजरा रिठी शेत शिवारात दोन हेक्टर ३२ आर म्हणजे ६ एकर शेती असुन शुक्रवार (दि.१०) डिसेंबर ला मजुर लावुन शेतातील धानाची गंजी लावत मशीन ने धान काढुन काही बोरे भरून व झाकुन ठेवले. सायंकाळ झाल्याने मजुर व शेतकरी घरी गेले. शनिवार (दि.११) डिसेंबर ला सकाळी ६ वाजता शेतकरी बंडु हिंगे हे शेतात गेले असता शेताती ल धानाची पुर्ण गंजी जळुन राख रांगोळी झाल्याची दिसली. आणि गंजी जवळ असलेली धान काढण्या च्या मशीनचे चाके शुध्दा जळाले होते. पहाटेच्या सुमा रास कोणीतरी अज्ञात इसमांनी आग लावल्याचे अस ल्याने कन्हान पोलीस स्टेशन गाठुन घटनेची तक्रार दिल्याने कन्हान पोस्टे चे अधिकारी, कोतवाल चौहान यांनी घटनास्थळी पोहचुन गावक-यांच्या उपस्थित पंच नामा केला. शेतात पिकविलेल्या धान्याच्या गंजीला अज्ञात इसमाकडून आग लावुन रांखरांगोळी करण्या चा प्रकार दिवसेदिवस वाढत असुन शेतक-यांच्या तोंड चा घास हिसकावुन शेतक-याचे नुकसान करून शेतक -यास अडचणीत ढकलण्यात येते. अश्या घटनेवर अंकुश लावण्याकरिता आग लावण्या-यास पकडुन दोषीवर कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच पिडीत शेतक-यास नुकसान भरपाई म्हणुन शासनाने आर्थिक सहाय्यता करण्यात यावी. अशी मागणी परिसरातील शेतकरी व नागरिकांनी केली आहे.