वेकोली सुरक्षा रक्षकावर गोळ्या झाडल्याने मृत्यूशी झुंज
कन्हान,ता.११ : डिसेंबर
कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत खदान नंबर सहा येथे इंदर काॅलरी व्यवस्थापक कार्यालयच्या मागे भर दिवसा वेकोली च्या सुरक्षा कर्मचाऱ्यावर गोळ्या झाडुन त्याचा हत्या करण्याचा प्रयत्नांने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलिसांच्या माहिती नुसार वेकोलि इंदर काॅलरी येथे एम.एस.एफ च्या कर्मचारी मिलिंद समाधान खोब्रागडे (वय -५०) रा.अकोला हा काही दिवसा पुर्वी वेकोली खदान मध्ये सुरक्षा कर्मचारी म्हणून नियुक्त झाला होता. रविवार (दि. ११) डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता च्या दरम्यान इंदर काॅलरी च्या चेक पोस्ट वर कर्तव्यावर रुजु होता. त्यावेळी आरोपी समिर सिद्धिकी (वय- २९) रा.अष्टविनायक, काॅलनी टेकाडी व राहुल जोसेफ जेकब (वय-२६) रा.कांद्री हे एका दुचाकी वाहना वर एका इसमाचा शोध घेत तेथे आले. मिलिंद याने त्यांना हटकले असता त्या दोघांचा मिलिंद सोबत वाद झाला. रागाच्या भरात आरोपी समीर याने आपल्या जवळील पिस्तूल ( देशी कट्टा) सारखी वस्तु काढुन दोन फायर केले. यात एक गोळी कंबरेला तर दुसरी डोक्यात झाडली. या मध्ये मिलींद गंभीर रुपाने जख्मी झाला. त्याला उपचारा साठी कामठी च्या खाजगी रुग्णालय येथे भर्ती केले. तिथे त्याची प्रकृति चिंताजनक सांगितली जात आहे. घटनास्थळावरून आरोपी कन्हान शहर सोडून पडत असताना पोलिस उपनिरीक्षक एम. एन.सुरजुसे आशा हॉस्पिटल मधून घरी जात असतांना ओळखीचा चेहरा दिसणारा दुचाकीवरून आरोपीं पळ काढताना आढळून आल्याने वाट अडवून अटक करून पोलीस स्टेशनला आणले. समीर सिद्दिकी यांच्या वर अनेक गुन्हे दाखल असून भारतीय सैन्यातून काढण्यात आलेला आहे.
सदर घटनेची माहिती मिळताच नागपुर ग्रामीण पोलीस अधिक्षक विशाल आनंद, उपविभागीय पोलीस अधिकारी मुख्तार बागवान, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, कन्हान पोलीस निरीक्षक विलास काळे आणि खापरखेडा,मौदा येथील पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहचले. कन्हान पोलीस स्टेशन ला आरोपीला अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करून पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक तपास सुरू आहे.
Post Views: 687
Thu Dec 15 , 2022
अखेर गोळीबार प्रकरणात वेकोलि सुरक्षा कर्मचारी चा उपचार दरम्यान मृत्यु वेकोलि सुरक्षा रक्षक मिलींद खोब्रागडे कन्हान,ता.१५ डिसेंबर कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत खदान नंबर सहा येथे इंदिर काॅलरी मॅनेजर कार्यालयाच्या मागे भर दिवसा दोन आरोपींनी वाद विवाद करुन वेकोली च्या सुरक्षा कर्मचाऱ्यावर गोळ्या झाडुन त्याला […]