खंडाळा ग्राम पंचायतीत महाविकास आघाडी चा विजय
कन्हान : – गट ग्राम पंचायत खंडाळा (गहुहिवरा) च्या सार्वत्रिक निवडणुक २०२१ च्या सरपंच व उपसरपंच निवडणुकीत महाविकास आघाडी शिवसेना च्या गहु हिवरा येथील सौ विमलबाई बोरकुटे सरपंच तर खंडा ळा येथील कॉग्रेस चे चेतन कुंभलकर उपसरपंच म्हणु न निवडुन आल्याने ग्रामस्थानी जल्लोष साजरा केला.
गुरूवार (दि.११) ला नऊ सदस्य असलेल्या गट ग्राम पंचायत खंडाळा (घटाटे) येथे सार्वत्रिक निवडणु क २०२१ च्या सरपंच व उपसरपंच निवडणुकीत महा विकास आघाडीच्या परिवर्तन पॅनल व्दारे सरपंच पदा करिता सौ विमलबाई शालीकजी बोरकुटे यांचा व उप सरपंच करिता चेतन रमेश कुंभलकर चा तर विरोधात जगदीश लुहुरे चा सरपंच आणि रविंद्र केने यांचा उपस रपंच करिता अर्ज दाखल केला होता. झालेल्या गुप्त मतदानात सरपंच करिता जगदीश लुहुरे ला ४ मते तर विमलबाई बरकुटे हयाना ५ मते तसेच उपसरपंचसाठी रविंद्र केने ला ४ मते तर चेतन कुंभलकर ला ५ मते मि ळाल्याने निवडणुक अधिकारी हयांनी एक मताने विम लबाई बोरकुटे सरपंच तर चेतन कुंभलकर उपसर पंच म्हणुन निवडुन आल्याचे घोषित केले. सरपंचा विमल बाई बोरकुटे, उपसरपंच चेतन कुंभलकर, सदस्य नि खिल दामोधरजी पाटील, सदस्या वर्षा मेघराज नागपु रे, सविता नितेश तेलोते यांचे ग्रामस्थानी जल्लोषात स्वागत केले. यावेळी भुषण निंबाळकर,कैलास खंडार, दिलीप राईकवार, प्रेमदास धरमारे, जयंता निंबाळकर, गजानन गजभिये, नवरंग वानखेडे, दुर्गा नागपुरे, कला वती तेलोते, प्रकाश साबरे, दिलीप हटवार, प्रकाश वान खेडे, यादोवराव कुंभलकर, प्रमोद बोरकुटे, पुरूषोत्तम चौधरी, विठ्ठल नवघरे, धर्मराज कुंभलकर, मंगेश नाग पुरे, स्वप्निल बोरकुटे, महेंद्र ठाकरे , नितीन पानतावने, शेषराव गौरखेडे, नितेश तेलोते, सुनिल लक्षणे, अमित निंबाळकर, राजेश राऊत, ब्रम्हा नवघरे, नारायण हटवा र, प्रणय भारव्दाज, राजेश हटवार, महादेव नागपुरे, बबन हटवार, गेंदलाल मेश्राम, सुनिल वानखेडे, उत्तम चौव्हाण, नितीन बोरकुटे सह ग्रामस्थ उपस्थित होते.