कन्हान परिसरात ४ मुत्यु तर नवीन ८४ रूग्णाची भर
#) कन्हान चाचणीत ८२, साटक २ असे ८४ आढळुन एकुण २६७४ रूग्ण.
#) कन्हान १ जुनिकामठी २, गहुहिवरा १ असे चौघाचा बळी.
कन्हान : – कोविड -१९ संसर्गरोगाचा प्रादुर्भाव वाढत असुन प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान तर्फे नगरपरिषद नविन भवन येथे शनिवार (दि.१०) एप्रिल ला रॅपेट २४२ चाचणीत ८२, प्राथमिक आरोग्य केंद्र साटक ३६ चाच णीत २ असे कन्हान परिसर ८४ रूग्ण आढळुन कन्हान १, जुनिकामठी २, गहुहिवरा १ असे ४ चा मुत्यु तर कन्हान परिसर एकुण २६७४ रूग्ण संख्या झाली आहे.
शुक्रवार (दि.९) एप्रिल २१ पर्यंत कन्हान परिसर २५९० रूग्ण असुन प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे नविन नगरपरिषद भवन येथे (दि.१०) एप्रिल शनिवार ला रॅपेट २४२ स्वॅब चाचणी घेण्यात आल्या. यात कन्हान ४१, कांद्री १६, टेकाडी को ख ११, गोंडेगाव ४, जुनीकामठी १, बोरडा २, खेडी २, खंडाळा २, गहुहिवरा १, कुंभापुर १, नागपुर १ असे ८२ रूग्ण तर आरोग्य केंद्र साटक च्या रॅपेट ३६ चाचणीत खेडी २ असे कन्हान परिसर ८४ रूग्ण आढळुन कन्हान परिसर एकुण २६७४ रूग्ण संख्या झाली. जुनिकामठी गावात कोरोना रूग्ण वाढत असुन दोघाचा मुत्यु झाल्याने गाव प्रतिबंधित करून कोरोना तपासणी शिबीर लावुन तपासणी करण्याची मागणी गावकरी करित आहे. कन्हान परिसरातील १६३७ रूग्ण बरे झाले. तर सध्या ९८९ बाधित रूग्ण असुन कन्हान (२३) सिहोरा ३, कांद्री (८) टेकाडी (३) निलज (१) गहुहिवरा (३) वराडा (३) गोंडेगाव १ साटक (१) जुनिकामठी २ असे कन्हान परिसरात एकुण ४८ रूग्णाचा मुत्यु झाला आहे.
कन्हान परिसर अपडेट दिनांक – १०/०४/२०२१
जुने एकुण – २५९०
नवीन – ८४
एकुण – २६७४
मुत्यु – ४८
बरे झाले – १६३७
बाधित रूग्ण – ९८९