बोरी (सिंगोरी) येथे अवैध रेती चोरीचा ट्रॅक्टर पकडला
#) आरोपीस पकडुन ट्रॅक्टर, १ ब्रॉस रेती सह ६ लाख ४ हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त.
कन्हान : – पोलीस स्टेशन कन्हान अंतर्गत बोरी (सिं गोरी) शिवारात कन्हान नदीची अवैध रेती चोरी करून ट्रॅकटर, ट्राली मध्ये भरून नेताना कन्हान पोली सानी सापळा रचुन शिताफितीने पकडुन आरोपी च्या ताब्या तील ट्रॅक्टर,ट्रॉली व १ ब्रॉस रेती असा सहा लाख चार हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त करून दोन आरोपी विरूध्द कारवाई करण्यात आली.
कन्हान पोलीस पेट्रोलिंग करीत असताना गुप्त माहिती मिळाली की, बोरी (सिंगोरी) कन्हान नदीची अवैद्यरित्या रेती चोरून नेत असल्याच्या गोपनिय मा हीतीची कन्हान थानेदार सुजित कुमार क्षीरसागर (परी.पो.उप अधिक्षक ) हयांनी सहानिशा करून स्वत: व सपोनि सतिश मेश्राम, सपोनि अमित कुमार आत्राम, पोलीस ताफ्यासह रविवार (दि.११) ला सकाळी ९ ते १० वाजता च्या दरम्यान बोरी (सिंगोरी) शिवारात सापळा रचुन शिताफीतीने आरोपी सुभाष चांदवालुके हा ट्रॅक्टर, ट्रॉलीत अवैद्यरित्या कन्हान नदी ची रेती चोरून वाहतुक करताना मिळुन आल्याने सपो नि सतिश मेश्राम यांचे सरकारी फिर्यादीने अपक्र १०८ /२०२१ कलम ३७९, १०९ भादंवी नुसार आरोपी ट्रॅक्टर चालक सुभाष दामाजी चांदवालुके वय व ट्रॅक्टर मालक राहुल येरणे दोघेही रा. बोरी (सिंगोरी) यांचे विरूध्द गुन्हा दाखल करून त्यांच्या ताब्यातील ट्रॅक्टर क्र एम एच ४० बी जी २४५६ किंमत ६ लाख रूपये, चोरीची १ ब्रॉस रेती किंमत ४ हजार रूपये असा एकु ण ६ लाख ४ हजार रूपयांचा मुद्दे माल जप्त करून कारवाई करण्यात आली.ही कार्यवाही नागपुर ग्रामीण पोलीस अधिक्षक राकेश ओला, पोलीस अपर अधिक्ष क राहुल माकणीकर, पोलीस उपविभागीय अधिकारी कन्हान मुख्तार बागवान यांचे मार्गदर्शनात परिवेक्षाधि न पोलीस उप अधिक्षक कन्हान थानेदार सुजितकुमार श्रीरसागर, सपोनि सतिश मेश्राम, सपोनि अमितकुमार आत्राम, नापोशि कुणाल पारधी, पोशि संजु बरोदिया, शरद गिते, सुधीर चव्हाण, कुणाल, जितेंद्र गावंडे सह पोलीस कर्मचा-यांनी कामगीरी यशस्विरित्या पार पाडली.