*श्रमसाफल्य संस्था व राष्ट्रीय बंजारा टायगर्स घाटंजी च्या पुढाकाराने सर्जिकल मास्कचे वितरण*
घाटंजी : एकीकडे कोरोनाचा आलेख वाढत असतांना शिवणी सर्कल मधील काही गावात बरेच लोक आजारी पडले आहेत,अशी माहीती काही गावातून राष्ट्रीय बंजारा टायगर्सचे शहर अध्यक्ष संजय आडे यांना मिळाली. त्या गावातील लोकांमध्ये माहितीचा अभाव असल्याने त्यांना लसीकरण करिता प्रवृत्त करणे व त्यांना मास्क वाटप करण्याची गरज आहे असे त्यांच्या लक्षात आले.घाटंजी येथील श्रमसाफल्य संस्थेचे अध्यक्ष अमित पडलवार यांना त्यांनी फोन करून सर्जिकल मास्कची मागणी केली व त्यांच्या मागणीला प्रतिसाद देत अमित पडलवार यांनी 1000 मास्क ची व्यवस्था करून दिली.त्यांनतर संजय आडे यांनी स्वतः त्या गावात जाऊन गावातील पोलीस पाटील राजेश चव्हाण यांच्या उपस्थितीत गरजू लोकांना मास्कचे वितरण केले व काही मास्क त्यांच्या स्वाधीन केले.त्यानंतर गावात घरोघरी जाऊन लोकांना लसीकरण करण्याबाबत माहिती दिली त्यांच्या मनात असलेले गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला.
18 ते 44 वयोगटातील लोकांचे ऑन लाईन रजिस्ट्रेशन करून देण्याची सूचना त्यांनी आपल्या बंजारा टायगर्स च्या पदाधिकाऱ्यांना दिली सोबतच काही लोकांचे ऑन लाईन रजिस्ट्रेशन करून दिले व आपले सहकारी राजेश आडे, विजय जाधव,श्रीराम जाधव,अविनाश मनोहर पेंदोर,निर्दोष भगवान जुमनाके,रोहित आडे,नितीन चव्हाण,चरण राठोड, दिलीप राठोड, यांना घेऊन गावात मास्कचे वाटप केले. खरं तर अशावेळी जिल्हापरिषद,पंचायत समिती, व ईतर पदाधिकारी समोर येऊन लोकांच्या मदतीला धावायला हवेअसतांना काही सामाजिक संस्था व सामाजिक कार्यकर्ते समोर येऊन मदत करत असल्याचे पाहून लोकांनकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.