शासनाच्या नियमाचे उल्लंघन करणार्यांन वर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी
#) भाजपा पदाधिकार्यांचे पोलीस निरीक्षकांना निवेदन
कन्हान – राज्यात कोरोना ची दुसरी लाट पुर्णपणे संपली नसुन शासनाने ५ जुलै पासुन राज्यात पुन्हा बिकेंड लाॅकडाऊन लावण्यात आल्याने शहरात शासनाच्या नियमाचे उल्लंघन होत असल्यामुळे भाजपा पदाधिकार्यांनी पोलीस निरीक्षकांना निवेदन देऊन नियमाचे उल्लंघन करणार्यां बेजबाबदार दुकानदारां वर व नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी केली आहे .
कांन्द्री – कन्हान , टेकाडी या शहराची वाढती लोकसंख्या मोठ्या प्रमाणात असुन राज्य शासने कोरोना सारखी घातक महामारी बीमारी आटोक्यात आणण्या करिता ५ जुलै पासुन राज्यात नवीन नियमावली लागु करण्यात आली असुन सर्व दुकानदारांना सकाळी ७:०० ते सायंकाळी ४:०० वाजे पर्यंत सुरु ठेवण्याचे आदेश लागु केले असुन बिकेंड लाॅकडाऊन मध्ये शनिवार व रविवार पुर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश लागु केले आहे . परंतु कन्हान , कांन्द्री , टेकाडी शहरात व परिसरात नागरिकांन व दुकानदार द्वारे शासनाच्या नियमाचे उल्लंघन होत असल्यामुळे कोरोनाची तिसरी लाट येण्याची दाट शक्यता वाढली असुन शहरात सकाळी ७ ते ४ वाजे पर्यंत नागरिक गर्दी करुन इकडे तिकडे रात्री पर्यंत फिरत असतात . काही इमानदार दुकानदार पोलीसांची गाडी येताच आपले दुकान बंद करुन देतात व काही बेजाबवदार दुकानदार हे पोलीसांची गाडी समोर जाताच पुन्हा आपली दुकाने रात्री उशिरा पर्यंत सुरु ठेवतात या रात्रीच्या दुकाने सुरु राहण्यामुळे अवैध धंद्यांना बाब मिळत असल्याने कोरोनाची तिसरी लाट येण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही .
हा धोका पुर्णपणे टाळण्यासाठी भाजपा पदाधिकार्यांनी पारशिवनी तालुका अध्यक्ष अतुल हजारे यांच्या नेतृत्वात व कांन्द्री शहर अध्यक्ष गुरुदेव चकोले यांच्या उपस्थिती मध्ये कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस स्टेशन अरुण त्रिपाठी यांना एक निवेदन देऊन पेट्रोलिंग वाढवण्याची मागणी केली असुन गरज पडल्यास शासनाच्या नियमाचे उल्लंघन करणार्यां बेजबाबदार दुकानदारां वर व नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी केली आहे .
या प्रसंगी जिल्हा महामंत्री जयराम मेहरकुळे , भाजपा पारशिवनी तालुका अध्यक्ष अतुल हजारे , तालुका अनु:सुचित जाती मोर्चा अध्यक्ष लीलाधर बर्वे , रिंकेश चवरे , संजय रंगारी , मयुर माटे , शिवाजी चकोले , सचिन वासनिक , शैलेश शेळकी , शेखर गिऱ्हे , लोकेश अंबाळकर , अमन घोडेस्वार , मनोज वाडे , सह आदि भाजपा पदाधिकारी उपस्थित होते .