अवैधरित्या गोवंश कत्तलीकरिता नेताना बोलेरो पिकअप वाहनास संपादकाने पकडले
कारवाईत १४ नग गौवंश व बोलोरो वाहनासह एकुण ५ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
कन्हान,ता.११ ऑगस्ट
पोलीस स्टेशन अंतर्गत खंडाळा शिवाराती ल महामार्गावर अवैधरित्या गौवंश कत्तलीकरिता बोलोरो पिकअप वाहनात भरून नेताना पोलीस टाई म्स न्यूज़ ईंडिया व न्युज पेपरचे संपादक अनिल देशमुख यांनी पकडुन कन्हान पोलीसांंच्या स्वाधिन केले.
प्राप्त माहिती नुसार अनिल कृष्णराव देशमुख ,(वय ५६) रा. वाठोडा नागपुर हे पोलीस टाईम्स न्युज इंडीया या न्यूज चैनल व न्युज पेपरचे संपादक आहे. ते गौतस्करी बाबत विशेष मोहीम राबवुन गौ तस्करीच्या गाडया पकडुन पोलीसांच्या स्वाधिन करित असतात. गुरुवार (दि.१०) ऑगस्ट ला रात्री १०.३० वाजता दरम्यान गुप्त बातमीदारा कडुन माहिती मिळाली की, भंडारा रोड ने रात्री बोलोरो पिक अप वाहन क्र.एम एच ३५ के ३२५२ वाहनाने गौवंश तस्करी होणार आहे. अश्या माहीतीनेे अनिल देशमुख तसेच सोबत सहकारी अवधेश सुरजमणी पांडे, राहुल निकेश धावडे, कुणाल राजु गभने, प्रमोद नारायणराव चौहाण मिळुन फोर्ड इंडेवर वाहन क्र. एम एच ०२ बीडी ०५१९ या गाडीने भंडारा रोड माथनी टोल नाका येथे शनिवार (दि.११) ऑगस्ट ला रात्री १२.१५ वाजता दरम्यान पोहचुन सदर स्थळी थांबुन बोलोरो पिकअप वाहनाची वाट पाहत असतांना काही वेळातच बोलोरो पिकअप वाहन टोल नाका पास झाले. पोलीस टाईम्स न्यूज़ ईंडिया चैनल चा स्टाफ ने तिचा पाटलाग सुरु केला. घटने बाबत पोलीस नियंत्रण कक्षास फोनवर माहीती दिली. बोलोरो पिकअप वाहन चालकाने आपले वाहन पारडी त्या नंतर नागपुर जबलपुर राष्ट्रीय चारपदरी बॉयपास महामार्गाने बोरडा टोल नाक्याचे पुर्वी असलेल्या पुला खालुन पाटलाग करत असतांना पुलाच्या वरुन एक अज्ञात इसमाने चार चाकी गाडीतुन मिडिया चा वाहनावर दगड फेकुन मारल्याने दगड वाहना ला लागुन वाहनाचे नुकसान झाले. समोर जावुन बोलेरो पिकअप वाहन चालकाने वाहन यु टर्न घेवुन पुलावरुन गाडी घेवुन पुल संपल्यावर खंडाळा शिवार माहामार्ग वर रात्री १ वाजता सुमारास बोलोरो पिकअप वाहन चालक वाहन सोडुन पळुन गेला. या घटनेची माहिती कन्हान पोलीसांना मिळताच पोलीसांनी व पोलीस टाईम्स न्यूज़ ईंडिया च्या स्टाफ ने वाहनाची पाहणी केली. मागिल डाल्यात १४ नग गौवंश क्रुरतेने कोंबुन एकमेकांना बांधुन त्यांचे खाण्यापिण्याची कोणतीही व्यवस्था न करता ठेवलेले दिसुन आले. कन्हान पोलीसांनी दोन पंचासमक्ष पंचनामा करुन ५ गाय, ५ बैल, ४ गोरे असे एकुण १४ नग गौवंश अंदाजे किंमत १,२०,००० रु. व बोलेरो पिकअप क्र.एम एच ३५ के ३२५२ अंदाजे किंमत ४,००,००० असा एकुण ५,२०, ००० रुपयांचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करण्यात आला. कन्हान पोलीसांनी पोलीस टाईम्स न्युज इंडीया न्यूज चैनल व न्युज पेपरचे संपादक अनिल देशमुख यांचे तक्रारी वरून पोस्टे ला अज्ञात आरोपी विरुद्ध अप क्र. ५१८/२३ कलम ११(१), ५ अ , २ , ९ , ४२७ अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक सार्थक नेहते यांचा मार्गदर्शनात कन्हान पोलीस करित असुन आरोपीचा शोध घेत आहे.
संपादक पकडु शकतो तर पोलीस का नाही ? पोलीस अधिक्षक काय भुमिका घेणार.
मागील अनेक दिवसापासुन कन्हान शहरातुन बिनधास्तपणे अवैधरित्या गोवंश कत्तली करिता पिक अप वाहन, ट्रक मध्ये क्रुरतेने कोंबुन एकमेकांना बांधुन मोठ्या प्रमाणात नेत असुन सुद्धा कन्हान पोलीस कुठल्याही प्रकारची कारवाई करित नाही. पोलीस टाईम्स न्यूज़ ईंडिया व न्युज पेपरचे संपादक अनिल देशमुख आणि त्यांचा स्टाफ ने भंडारा रोड माथनी टोल नाका ते खंडाळा शिवारातील महामार्गापर्यंत पाठलाग करुन पकडल्याने कन्हान पोलीस विभागात एकच खळबळ उडाली असुन पोलीसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्न निर्माण झाले आहे. न्यूज़ चैनल ची टीम अवैधरित्या गोवंश कत्तली करिता नेणा-या वाहना ला पकडु शकते, तर कन्हान पोलीस का नाही पकडु शकत. शहरात अश्या अनेक चर्चेला उधाण आले आहे. नागपुर ग्रामिण पोलीस अधिक्षक विशाल आनंद न्यूज़ चैनल स्टाप च्या मोठी कारवाई नंतर पुढे कसली भुमिका घेणार आणि कसले निर्देश कन्हान पोलीसांना देतात या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Post Views: 802
Wed Aug 16 , 2023
७६ व्या दिनानिमित्त भूमिपुत्र बहुउद्देशी संस्थेच्या मार्फत रक्तदान शिबिर व विद्यार्थी सत्कार कन्हान,ता.१६ ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या ७६ व्या दिनानिमित्त भूमिपुत्र बहुउद्देशी संस्थांच्या मार्फत तारसा चौक, महाकाली कॉम्प्लेक्स येथे रक्तदान शिबिर आणि विद्यार्थी सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. भूमिपुत्र बहुउद्देशीय संस्था यांनी इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय […]