पोटनिवणुकीत अनेक मतदारांचे यादीतुन नाव गहाळ  तीस टक्के च्या वर स्थानिक मतदाना पासुन वंचित आज (दि.१२) ऑगस्ट ला सकाळी मतमोजणीचा निकाल 

पोटनिवणुकीत अनेक मतदारांचे यादीतुन नाव गहाळ

तीस टक्के च्या वर स्थानिक मतदाना पासुन वंचित

आज (दि.१२) ऑगस्ट ला सकाळी मतमोजणीचा निकाल 

कन्हान, ता.१२

    नगरपरिषद कन्हान-पिपरी प्रभाग क्र. ७ येथे अनुसूचित जमाती सदस्य पदाच्या एका रिक्त जागेसाठी रविवार (दि.११) ऑगस्ट ला मतदारांनी ४६.९६ टक्के मतदानाचा हक्क बजावला. पोट निवडणुकीत निवडणुक अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणा मुळे अनेक मतदारांचे यादीतुन नाव गहाळ झाले असल्याने ३० टक्के च्या वर स्थानिक मतदार, मतदाना पासुन वंचित झाल्याने मतदारात रोष बघायला दिसला.

     कन्हान-पिपरी नगरपरिषद प्रभाग क्र.७ मधिल अनुसूचित जमाती सदस्य पदाच्या एका रिक्त जागे साठी च्या निवडणुकीत महाविकास आघाडी कडुन काॅंग्रेस पक्षाचे उम्मेदवार सौ.राखी संदीप परते पंजा चिन्हावर निवडणुक लढविली. तर भाजपा-शिवसेना (शिंदे गट) महायुती मध्ये फुट पडल्याने भाजप पक्षाचे उम्मेदवार नंदकिशोर शंकर श्रीरामे कमळ चिन्हावर व शिवसेना शिंदे गटाचे उम्मेदवार हिरालाल चंद्रभान नारनवरे धनुष्यबाण चिन्हावर निवडणुकीच्या मैदाना च्या रिंगणात उभे होते. निवडणुक अधिकारी वंदना संर्वगपते, नगरपरिषद मुख्याधिकारी रविंद्र श्रीराम राऊत यांच्या नेतृत्वात निवडणुक घेण्यात आली. एका केंद्रावरील पाच बुथ वर  मतदान सकाळी ७ वाजता पासुन सायंकाळी ५ वाजे पर्यंत प्रभागातील एकुण मतदार ४६२९ पैकी पुरूष ११५० व स्त्री १०२४ असे एकुण २१७४ मतदारानी मतदानाचा हक्क बजावल्याने ४६.९६ टक्के मतदान झाले.

     या निवडणुकीत निवडणुक अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे प्रभाग सात मध्ये मुत्यु झालेल्या मतदारांची नावे असुन ज्या लोकांचे लग्न झाले, दुसऱ्या शहरातील रहिवासी असुन देखिल त्यांचे नाव यादीत होते. तसेच एकाच घरातील १ ते ३ लोकांचे नावे होती तर ४ ते ५ लोकांचे नावे नव्हती. परंतु नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मतदान केलेल्या अनेक मतदारांचे यादीत नावे गव्हाळ होती. त्यामुळे उमेदवारांना आणि पक्षाच्या नेत्याना आणि कार्यकर्त्यांना मतदारांच्या रोषाला सामोरे जावुन चांगलीच धावपळ करावी लागल्याने पाहिजे तसे मतदान होऊ न शकल्याने मतदानाची टक्केवारी घटली.

      कन्हान पोलीस स्टेशन निरीक्षक उमेश पाटील यांच्या चौख पोलीस बंदोबस्तात शांततेत मतदान पार पडले. सोमवार १२ ऑगस्ट ला मतमोजणी होणार असुन महाविकास आघाडी काॅंग्रेस पक्षाचे उम्मेदवार सौ.राखी संदीप परते, भाजपा पक्षाचे उम्मेदवार नंदकिशोर श्रीरामे व शिवसेना शिंदे गटाचे उम्मेदवार हिरालाल नारनवरे या तिघाचे इव्हीएम मशीन मध्ये भाग्य सिल बंद असुन कोण निवडणुक जिंकणार याकडे शहरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. यासोबतच निवडणूकीत राजकीय नेत्यांनी गल्लोगल्ली फिरून संपूर्ण मतदान क्षेत्र पींजून काढल्याने त्यांचा सुध्दा प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण झालेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

पोटनिवणुकीत महाविकास आघाडी च्या राखी परते विजयी

Mon Aug 12 , 2024
पोटनिवणुकीत महाविकास आघाडी च्या राखी परते विजयी कन्हान, ता.१२ प्रतिनिधी        नगरपरिषद कन्हान-पिपरी प्रभाग क्र. ७ येथे अनुसूचित जमाती सदस्य पदाच्या एका रिक्त जागेसाठी झालेल्या निवडणुकीत मतदारांनी ४६.९६ टक्के मतदान केले.      पोट निवडणुकीत निवडणुक अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणा मुळे अनेक मतदारांचे यादीतुन नाव गहाळ झाले असताना सुध्दा महाविकास […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta