सावनेर च्या हितेश बन्सोड यांनी महिला व तिच्या १५ दिवसाच्या बाळास दिला आधार

सावनेर च्या हितेश बन्सोड यांनी महिला व तिच्या १५ दिवसाच्या बाळास दिला आधार


कन्हान : –  मुलीला जन्म दिल्याने पतीने स्विकार न केल्याने निराधार झालेल्या छतीसगढ राज्यातील राजनांदगाव च्या कुमारीबाई हिने न खचता मुलीला जगविण्या करिता तिथुन निघुन भटकत कन्हान रेल्वे स्टेशन ला पोहचल्यावर कन्हान च्या प्रशांत पाटील यांना दिसल्याने बाळा मेश्राम हयांनी  हितज्योती फाऊंडेशन सावनेर चे हितेशदादा बन्सोड शी संपर्क करून निराधार कुमारीबाई व तिच्या १५ दिवसाच्या बाळास  आधार देत मानुष्की जोपसली.  

जाहिराती करिता संपर्क 7020602961

           रेल्वे स्टेशन कन्हान येथे छतीसगढ राज्यातील दुर्ग जिल्हयात शासकीय रूग्णालयात कुमारीबाई हिने गोळस बाळाला जन्म दिला. परंतु मुलगी झाल्याने तिच्या पतीने स्विकार करण्यास नकार दिल्याने ती न खचता हिंमतीने मी काहीपण करून माझ्या गोळस मुलीला जगविण्याकरिता १५ दिवसाचे बाळ घेऊन कुमारीबाई दुर्ग वरून कसीतरी कन्हान रेल्वे स्टेशनवर पोहचली. रात्री ९ वाजता रेल्वे स्टेशन समोर बाळास घेऊन भटकत असताना कन्हान येथील प्रशांत पाटील यांना दिसल्याने तिची विचारपुस केली असता तिची आप बिती ऐकल्यावर कन्हान पोलीस स्टेशन ला माहीती दिली. पोलीस कर्मचाऱ्यारी संख्या कमी त्यात आधीच चार प्रकरणे सुरू आहे. पोलीसांनी म्हटल्यावर प्रशांत पाटील यांनी समाज सेवी बाळा (रजंनिश) मेश्राम यास बोलावुन हकीकत सांगितल्याने या महिलेची व बाळाची मदत फक्त हितेश दादा बन्सोड करू शकतो. तेव्हा हितेश दादाला फोन वरून माहीती दिली असता त्यांनी आपली अँब्युलस घेऊन येण्यास होकार दिला. कन्हान पोलीस स्टेशनचे दोन पोलीसानी चौकसी करून ती सज्ञान असल्याने काही करण्यास असमर्थता दर्शवली. रात्र झाल्याने प्रशांत पाटील व अविनाश चौधरी यांनी आपल्या घरून जेवण व चादर, शाल व गरम कंबल महिलेला आणुन नगदी २५० रूपये देऊन रेल्वे स्टेशन च्या आत जेवण देऊन तात्पुरती व्यवस्था केली. रात्री ११ वाजता परत घरून गरम कंबल, मोजे, रूमाल व लहान बाळा करिता स्वेटर आणुन दिले. 

             हितज्योती फाऊंडेशन सावनेर, हितेश दादा बन्सोड हे रोडवरील निराधार, अनाथ, बेवारस, अपंग लोकाच्या मदती करिता सदैव कार्य करित असुन सावनेर वरून कन्हान ला येताना रस्त्यात माळेगाव जवळ एका हरिणाचा अपघात झाल्याचे आढळल्याने थांबुन त्याची पाहणी करून वनविभागाला माहीती देऊन प्राणी रक्षक पथकाच्या त्या हरिणाला स्वाधिन करून कन्हान ला १२.३० वाजता हितेश दादा पोहचुन कुमारीबाई व बाळाची विचारपुस करून तिच्या मदतीच्या हाकेने सावनेर ला नेण्याकरिता कन्हान पोलीस स्टेशन ला हेकॉ शेळके यांनी नोंद करून घेतली. मध्यरात्री १.३० वाजता अँब्युलस मध्ये बसवुन सावनेर ला घेऊन गेले. निराधार कुमारीबाई व तिच्या १५ दिवसाच्या गोळस मुलीला मदतीचा आधार दिला. याप्रसंगी हितज्योती फाऊडेशन सावनेर चे हितेश दादा बन्सोड सहकारी रजत रूसिया, राजा फुले, उमेश मोरे आणि कन्हान चे प्रशांत पाटील, बाळा (रंजनिश) मेश्राम, अविनाश चौधरी, देशौन्नती पत्रकार मोतीराम रहाटे, ऋृषभ बावनकर, सोनु मसराम, श्रीकांत पाटील आदीने मानुष्की जोपसत महत्वाची भुमिका पार पाडली.   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

धर्मराज शाळेत राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण

Fri Nov 12 , 2021
*धर्मराज शाळेत राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण कन्हान ता.12  शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, शिक्षा मंत्रालय नवी दिल्ली यांचे मार्फत संपूर्ण देशभरात शुक्रवारी (ता १२) राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणाची अंमलबजावणी करण्यात येत आहे.     हे सर्वेक्षण विद्यार्थ्यांच्या अध्ययन निष्पत्ती मधील संपादणूकीचे मूल्यांकन करणे व देशाच्या शिक्षण प्रक्रियेच्या आरोग्याचे मूल्यांकन करणेसाठी एकाच दिवशी […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta