पारशिवनी तालुका सरपंच, उपसरपंच निवडणुकीत महाविकास आघाडी चा भरघोष विजय
कन्हान : – पारशिवनी तालुक्यातील दहा गट ग्राम पंचायतीच्या सरपंच, उपसरपंच निवडणुकीत कॉग्रेस ५ सरपंच, ६ उपसरपंच, शिवसेना ३ सरपंच, ४ उपसरपंच व राष्ट्रवादी १ सरपंच निवडुन येऊन विरोधी पक्षचे खातेही न उघडल्याने या निवडणुकीत तालुक्यात महाविकास आघाडी ने भरघोष विजय मिळविला आहे.
गट ग्राम पंचायत सार्वत्रिक निवडणुक २०२१ च्या पारशिवनी तालुक्यात १० ग्राम पंचायतीच्या सरपंच, उपसरपंच पदाकरिता गुरूवार (दि.११) ला निवडणुक घेण्यात आली.१) बोरी (सिंगारदिप) गट ग्राम पंचायत येथे सरपंच पद अनुसुचित जाती महिला करिता राखीव होते. परंतु अनु.जाती महिला उपलब्ध नसल्यामुळे व एक ही नामनिर्देशन पत्र प्राप्त न झाल्याने सरपंच पद रिक्त आहे. उपसरपंच निवडणुकीत शिवसेनेच्या सर्वसाधारण पदात सौ शुभांगी अशोक टोहणे निवडुन आल्या. २) खेडी गट ग्राम पंचायत येथे बोरी (राणी) कॉग्रेस च्या सौ छाया प्रकाश कोकाटे नामाप्र महिला राखीव पदात सरपंचा तर खेडी कॉग्रेस च्या संगिता देवराव इंगळे सर्वसाघरण पदातुन उपसरपंच म्हणुन निवडुन आल्या. ३) निमखेडा गट ग्रा प येथे कॉग्रेस च्या सौ कलावती सुभाष तडस सर्वसाधारण महिला सरपंचा तर कॉग्रेसचे देवा कचरू डोंगरे सर्व साधारण पदात उपसरपंच म्हणुन निवडुन आले. ४) खंडाळा (घटाटे) गट ग्रा प येथे गहुहिवरा शिवसेने च्या विमलबाई शालीकजी बोर कुटे सर्व साधरण पदात तर खंडाळा कॉग्रेस चे चेतन रमेश कुंभलकर सर्वसाधारण म्हणुन निवडुन आले. ५) माहुली गट ग्राप मध्ये कॉग्रेसचे प्रेमचंद रामदास कुसुंबे नामाप्र पदात सरपंच तर शिवसेनेच्या सौ माया माणि कचंद अमृते सर्वसाधारण पदात उपसरपंच निवडुन आले. ६) नवेगाव खैरी गट ग्राप मध्ये कॉग्रेसचे कमलाकर तुळशीराम कोठेकर सर्वसाधारण पदात सरपंच तर कॉग्रेसचे राजु श्रावण पुरकाम उपसरपंच पदी निवडुन आले. ७) आमगाव गट ग्राप मध्ये कॉग्रेसच्या सर्व साधारण महिला पदात सौ मायाताई इंद्रपाल गोरले सरपंच तर सर्वसाधरण पदात रमेश शिवरकर उपसरपंच निवडुन आले. ८) पिपळा गट ग्रा प मध्ये राष्ट्रवादीचे सर्वसाधारण पदात सचिन खुशाल आमले सरपंच तर कॉग्रेसचे सर्वसाधरण पदात गौतम विठ्ठल गजभिये उपसरपंच निवडुन आले.९) इटगाव गट ग्रा प मध्ये शिवसेनेचे नामाप्र पदात अतुल पाडुरंग काळे सरपंच तर सर्वसाधारण पदात शिवसेनेचे ज्ञानेश्वर मनोहर वासे उपसरपंच म्हणुन निवडुन आले. १०) सुवरधरा गट ग्रा प मध्ये अनु.जमाती महिला पदात शिवसेनेच्या केशवंता ग्यानेश्वर इडपाची सरपंच तर सर्वसाधारण पदात शिवसेनेचे गजु विठोबा सावरकर उपसरपंच निवडुन आल्याने कॉग्रेस ५ सरपंच, ६ उपसरपंच, शिवसेना ३ सरपंच, ४ उपसरपंच, राष्ट्रवादी चा १ सरपंच निवडुन आल्याने विरोधी पक्षाचे सरपंच, उपसरपंच निवडणुकीत खाते सुध्दा न उघडल्याने महाविकास आघाडीने भरघोष विजय मिळविला.